TIMES OF AHMEDNAGAR | RAJASTHAN | CRICKETER ROHIT SHARMA | RANJI CRICKETER ROHIT SHARMA PASSED AWAY SUDDENLY | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
माजी रणजीपटू रोहित शर्माचे शनिवारी ४० व्या वर्षी निधन झाले. राजस्थान रणजी क्रिकेट संघातील क्रिकेटपटू रोहित शर्माने सलामीवीर म्हणून यापूर्वी अनेक सामने खेळले होते. रोहित शर्मा मागील काही दिवसांपासून आजारी होता. एबीपी माझाने मीडिया रिपोर्टच्या दिलेल्या माहितीनुसार, रोहित शर्मा याला यकृताशी संबंधित समस्या होत्या आणि चार-पाच दिवसांपूर्वी शहरातील रुग्णालयात दाखल करण्यात आलं होते. तिथे त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान शनिवारी त्याचं निधन झाले आहे.
राजस्थानचा सलामीवीर रोहित शर्माचे निधन झाले असताना नावामुळे सोशल मीडियावर काही प्रमाणात गोंधळ सुद्धा पाहायला मिळत आहे. निधनाची माहिती समोर येताच काहींनी भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याच्या फोटोसह पोस्ट केल्या होत्या. मात्र हा गोंधळ दूर होताच रोहितच्या फॅन्सनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
स्त्रोत. सोशल मिडिया
राजस्थानचे सलामीवीर रोहित शर्मा यांचा क्रिकेट मधील प्रवास
रोहित शर्माच्या क्रिकेटमधील योगदानाविषयी सांगायचे तर त्याने संपूर्ण कारकिर्दीत २८ एकदिवसीय रणजी सामने खेळले आहेत. ज्यात राजस्थानच्या रणजी क्रिकेट संघाकडून त्यांनी सात रणजी सामन्यांचा समावेश आहे. या २८ सामन्यांमध्ये त्याने दोन शतके आणि तीन अर्धशतकांसह ३५ पेक्षा जास्त सरासरीने एकूण ८५० धावा केल्या होत्या.
याव्यतिरिक्त, शर्मानी चार टी-२० सामन्यांमध्ये भाग घेऊन आपले अष्टपैलुत्व दाखवले होते, रोहित शर्माच्या नावे सहा विकेट्स असून त्यानी आपल्या लेग-स्पिन गोलंदाजीने २००४ ते २०१४ अशा १० वर्षांच्या कारकिर्दीत अनेकदा लक्ष वेधून घेतले होते. व्यावसायिक क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर, शर्मानी प्रशिक्षक होण्याचे ठरवले आणि इच्छुक क्रिकेटपटूंना ज्ञान आणि कौशल्य प्रदान करण्यासाठी आरएस क्रिकेट अकादमीची जयपूर येथे स्थापना केली होती.