एकत्रच्या प्रश्नावर अजित पवारांचं शिरुरमधलं वक्तव्य चर्चेत….. शंका ठेवू नका आम्ही पुन्हा एकत्र…,
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | POLITICS | NATIONALIST CONGRESS PARTY | NATIONALIST SHARAD CHANDRA PAWAR GROUP | FORMER UNION MINISTER SHARAD PAWAR | DEPUTY CHIEF MINISTER AJIT PAWAR | MP AMOL KOLHE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
काका पुतण्याचा वाद महाराष्ट्राला नवीन नाही, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे , गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे , मात्र इतर जोड्यांपेक्षा शरद पवार आणि अजित पवार यांची जुडी जरा जास्तच चर्चेत असते. चुलते शरद पवार यांना सत्तेचा जोर का झटका हळूच देऊन अजित पवार जुलै २०२३ सत्तेत सामिल झाले.परिस्थिती बदलून निर्णय घ्यावा लागतो असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. भविष्या शरद पवारांसह जाणार का या ज्या चर्चा सुरु असतात त्यावर अजित पवारांनी थेट उत्तर देऊन टाकलं आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
त्या वेळची परिस्थिती पाहून निर्णय ….
त्या त्या वेळची परिस्थिती पाहून निर्णय घ्यावे लागतात. आपल्या वडिलधाऱ्यांनीही असेच निर्णय घेतले आहेत. हे तुम्ही पाहिलं आहे. नदीचा काठ, रस्त्याची दुरवस्था काय असायची ते मला माहीत आहे. आपल्या वडिलधाऱ्यांनी सगळ्या सहन केल्या. आम्हीही राजकारणात आलो. संस्था चांगल्या प्रकारे चालवण्याचा प्रयत्न आमच्या परिने केला.
आता सरळ सरळ फाटी पडली आहे. आपण एका बाजूला ते (शरद पवार) एका बाजूला. त्यामुळे काहीजणं म्हणतात ही एकत्र येतील का रं ? दबकत बोलतात दादा काही होईल का ? मी ही चर्चा करणाऱ्या सगळ्यांना सांगू इच्छितो, हे काही होणार नाही. मित्रांनो मी आपल्याला स्पष्ट सांगतो की आपली वेगळी वाट आहे त्यांची वेगळी वाट आहे. आज ही लोकांच्या मनात शंका आहे. बरेच जण म्हणतात हे परत एकत्र येतील की काय? अरे बाबांनो आता आमच्यात फाटलंय. उगाच मनात काही शंका ठेऊ नका.
स्त्रोत.सोशल मिडिया.
अमोल कोल्हेंना मत द्या हे मीच सांगितलं होतं
मागच्या खेपेला मीच तुम्हाला अमोल कोल्हेंना मतदान करा हे सांगायला आलो होतो. मी त्यांना दुसऱ्या पक्षातून इथे ( राष्ट्रवादी ) आणलं, प्रवेश दिला, तिकिट दिलं. दिलीपराव (दिलीप वळसे पाटील) आणि मी सीट निवडून आणायची जबाबदारी घेतली होती. मलाही वाटलं होतं की वक्तृत्व चांगलं आहे, दिसायला राजबिंडा आहे. दोन वर्षांतच म्हणाले राजीनामा द्यायचा. मी कलावंत आहे वगैरे सांगत होते. मी त्यांना म्हटलं तसं करु नका. तर मला म्हणाले मी सेलिब्रिटी आहे. तरीही मी त्यांना म्हणायचो की तुम्ही जाऊ नका. पण राजकारण हा अमोल कोल्हेंचा पिंडच नाही. धर्मेंद्र, गोविंदा, सनी देओल यांनीही निवडणूक लढवली होती. त्यांचा राजकारणाशी काय संबंध ? असंही अजित पवार म्हणाले.