राखी सावंत अंबानींवर नाराज,मला बोलवले असते तर मी ते केले असते…. राखी सावंतच्या या वक्तव्याने बॉलीवूड मध्ये रंगली वेगळीच चर्चा……
TIMES OF AHMEDNAGAR | MUMBAI | BOLLYWOOD | MUKESH AMBANI | ANANT AMBANI | RADHIKA MERCHANT | ACTRESS RAKHI SAWANT | ANANT AMBANI AND RADHIKA MERCHANT PRE WEDDING CEREMONY | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
देशाचे मोठे उद्योगपती मुकेश अंबानींचे छोटे सुपुत्र अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांचा नुकताच प्री-वेडिंग सोहळा पार पडला आहे. १ मार्च ते ३ मार्च असा तीन दिवसांचा हा प्री-वेडिंग सोहळा मोठ्या थाटामाटात, धुमधडाक्यात पार पडला. या सोहळ्याला विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी उपस्थित राहिली होती. सध्या या सोहळ्याचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर खूप चर्चेत आहेत. आणि अशा वातावरणातच राखी सावंतने मुकेश अंबानी यांच्यावर तिला सोहळ्याला बोलावलं नाही म्हणून नाराजी व्यक्त केली आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया
हे माझ्यासमोर शेंगा आहेत.
सेलिब्रिटी फोटोग्राफर ‘विरल भयानी’ च्या पेजवर राखी सावंतचा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये राखी सावंत म्हणते अंबानी नमस्कार, तुम्ही मला प्री-वेडिंग सोहळ्याला का नाही बोलावलंत ? तुम्हाला माहिती आहे का मला जर तुम्ही बोलावलं असतं तर मी मंच, खुर्च्या तोडल्या असत्या. अंबानीजी तुम्ही अजून माझा डान्स पाहिला नाही. रिहाना अॅकॉन अशा लोकांना तुम्ही का बोलावलं ? हे माझ्यासमोर शेंगा आहेत. तुम्ही माझा डान्स पाहिलाय का मुन्नी बदनाम हुई, परदेसिया एवढी गाणी मी केली आहेत. तरीही तुम्ही मला का बोलावलं नाही ? हजार कोटी देऊन तुम्ही यांना बोलावलं. तरीही रिहाना फाटलेल्या कपड्यांमध्ये आली होती अंबानीजी. मी जर आले असते तर हॉट आणि सेक्सी कपडे घालून आले असते. माझ्या कपड्यांनी मी तुमचा स्टेज पुसला असता.
स्त्रोत.सोशल मिडिया
मी तुमच्या सर्व आलेल्या पाहुण्यांचं मनोरंजन केले असते.
एवढ्यावरच राखी सावंत थांबली नाही तर ती मुकेश अंबानींना म्हणाली कि मला प्री वेडिंगला बोलवण्याचे चार फायदे होते. मी तुमच्या सर्व आलेल्या पाहुण्यांचं मनोरंजन केले असते. डान्स केला असता, तुमचे जितके पाहुणे आले होते त्यांचं जेवण झाल्यानंतर सर्व भांडी घासली असती. सर्वांच्या खोल्या साफ केल्या असत्या. मी काय केलं नसते. तुम्ही हजार कोटी खर्च करून कोणाला बोलावलं ? अरे तुम्ही राखी सावंतला बोलावलं नाही. हे तुम्ही काय केलत ? असं राखी सावंत म्हणाली.