By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या पत्र सूचना कार्यालयातर्फे अध्यात्मिक पर्यटनाचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम वार्तालाप यशस्वी.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या पत्र सूचना कार्यालयातर्फे अध्यात्मिक पर्यटनाचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम वार्तालाप यशस्वी.
अहमदनगर

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या पत्र सूचना कार्यालयातर्फे अध्यात्मिक पर्यटनाचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम वार्तालाप यशस्वी.

TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | GOVERNMENT OF INDIA | MINISTRY OF INFORMATION AND BROADCASTING | LETTER NOTIFICATION OFFICE UNDER THE MINISTRY OF INFORMATION AND BROADCASTING | AHMEDNAGAR DISTRICT | SHIRDI | WORKSHOP FOR JOURNALISTS | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.

Last updated: 2024/03/07 at 10:55 AM
By BHAIYYASAHEB BOXER 7 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या पत्र सूचना कार्यालयातर्फे बुधवार, दिनांक ६ मार्च रोजी अध्यात्मिक पर्यटनाचे आर्थिक आणि सामाजिक परिणाम या विषयावर आयोजित वार्तालाप माध्यम परिषदेचे उद्घाटन श्री. कोळेकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पोलीस उपअधीक्षक शिरिष वमने, श्री साईबाबा सेवा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर, पत्र सूचना कार्यालय, पुणेचे उपसंचालक महेश अय्यंगार आणि माध्यम अधिकारी हर्षल आकुडे हे उपस्थित होते. तर सुमारे १०० पत्रकार या कार्यशाळेमध्ये सहभागी झाले होते. पत्र सूचना कार्यालय पुणेचे उपसंचालक महेश अय्यंगार यांनी आपल्या प्रास्ताविकात पत्र सूचना कार्यालयाच्या कामाविषयी माहिती दिली.पत्र सूचना कार्यालय ही केंद्र सरकारची धोरणे, कार्यक्रम आणि आजवरचे यश याबाबतची माहिती मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक माध्यमांपर्यंत अधिकृतरित्या पोहचवणारी मध्यवर्ती यंत्रणा असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय दुर्गम भागात राहणाऱ्या नागरिकांशी संपर्क साधणे आणि शासनाची धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्र सूचना कार्यालय विविध विषयांवरच्या चर्चासत्रांचे आयोजन करते. अशी चर्चासत्र म्हणजे, तळागाळातील लोकांपर्यंत माहिती पोहोचवणे आणि त्याचवेळी सरकार आणि माध्यमांमधे एक दुवा निर्माण करणारे माध्यम आहे, असे महेश अय्यंगार यांनी सांगितले.

Shirdi Sai Baba Temple to Reopen Tomorrow: Here's How You Can Travel From  Mumbai to Shirdi - News18स्त्रोत.सोशल मिडिया.

शिर्डी येथे उद्योग आणण्याच्या दृष्टीनेही शासनाचे प्रयत्न सुरू

शिर्डीचे अप्पर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी शिर्डी परिसरात प्रस्ताविक विकासकामांचा आढावा घेतला. पर्यटनाच्या विकासासाठी केंद्र तसेच राज्य सरकार कालबद्ध पद्धतीने कार्यरत असून भविष्यात याचे परिणाम दिसतील, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की अहमदनगर जिल्ह्यात पर्यटनाशी संबंधित अनेक ठिकाणे आहेत. त्यांची माहिती राज्यात सर्वत्र पोहोचवण्यामध्ये माध्यमांची भूमिका महत्त्वाची आहे. गेल्या काही वर्षांमध्ये देशातील अध्यात्मिक पर्यटनामध्ये मोठी वाढ पाहायला मिळत आहे. याचा विचार करून शासनाने शिर्डीच्या विकासासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्याअंतर्गत शिर्डी येथे ३२ एकर परिसरात शासकीय कार्यालयांची उभारणी करण्यात येत आहे. त्यामध्ये नाट्यगृहे, बहुद्देशीय सभागृह यांचाही समावेश असणार आहे.  त्याशिवाय शिर्डी येथे उद्योग आणण्याच्या दृष्टीनेही शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. शिर्डी हे अध्यात्मिक क्षेत्र असल्याने येथे येणारे उद्योग हे प्रदूषणविरहीत असतील, याची काळजीही घेण्यात येईल. तसेच कोपरगाव परिसरात पशुवैद्यकीय महाविद्यालय यांच्यामुळे येथील विकासाला चालना मिळेल. येथील विकास हा एकात्मिक स्वरुपाचा सर्वांना सामावून घेणारा असला पाहिजे, असे शासनाचे धोरण आहे. या सर्व कामांच्या बळावर शिर्डी परिसरात रोजगाराच्या संधीही वाढतील, असंही बाळासाहेब कोळेकर यांनी सांगितले. 

पोलीस उपअधीक्षक शिरीष वमने म्हणाले शिर्डीचा मोठ्या प्रमाणात कायापालट होत असून यादरम्यान शहर हे स्थित्यंतरामधून जात आहे. या घडामोडींमध्ये पोलिसांचीही मोठी भूमिका असते. त्यामुळे शिर्डीत दाखल होणाऱ्या भाविकांना सुरक्षित वातावरण देणे, गुन्हेगारी प्रवृत्तींना प्रतिबंध करणे, ही भूमिका पोलीस प्रशासन जबाबदारीने पार पाडत आहे. कार्यशाळेतील पहिल्या सत्रात श्री साईबाबा सेवा संस्थान ट्रस्ट, शिर्डीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी ‘अध्यात्मिक पर्यटनवाढीसाठी संस्थान ट्रस्टच्या भावी योजना’ या विषयावर माहिती दिली. ते म्हणाले, कोरोना काळानंतर शिर्डीच्या विकासात वाढ पाहायला मिळत आहे. २०२२ या वर्षात शिर्डीला १ कोटी ७२ लाख पर्यटकांनी भेट दिली. तर २०२३ मध्ये हाच आकडा १ कोटी ९० लाखांवर गेला. इतक्या मोठ्या संख्येने पर्यटक शहरात दाखल होत असताना त्यांना सोयीसुविधा देणे, हे आव्हानात्मक काम आहे. संस्थान त्यासाठी प्रयत्न करत असून भाविकांना राहण्याची उत्तम सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिर्डीत दाखल होणारे भाविक हे जास्तीत जास्त काळ येथे वास्तव्याला राहावेत, त्यांनी परिसरातील पर्यटन क्षेत्रांनाही भेट द्यावी या दृष्टीने प्रशासनाला आवश्यक ते सहकार्य करण्याची संस्थानची तयारी आहे, असे त्यांनी सांगितले. 

24 Places to visit in Shirdi India 2024 | Best Tourist placesस्त्रोत.सोशल मिडिया.

धार्मिक पर्यटन : आर्थिक आणि सामाजिक परिणाम.

धार्मिक पर्यटन : आर्थिक आणि सामाजिक परिणाम’ या विषयावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार आणि आर्थिक विषयातील तज्ज्ञ यमाजी मालकर म्हणाले की जगातील सर्वात मोठ्या पहिल्या १० उद्योगांमध्ये पर्यटन उद्योगाचा समावेश होतो. भारतात अध्यात्मिक पर्यटन हे वर्षानुवर्षे चालत आलेले असून वृद्धापकाळात चारधाम यात्रा करणे हा त्याचाच एक भाग होता. भारताच्या जीडीपीमध्ये पर्यटन क्षेत्राचा वाटा ५.८  टक्के इतका आहे. अमेरिका, चीन, जर्मनी, जपान आणि इटलीनंतर हा वाटा सर्वाधिक असलेला भारत हा सहावा देश आहे. ते पुढे म्हणाले, पर्यटनाचे आर्थिक परिणाम असतात, तसेच याचे सामाजिक परिणामही पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणावर भाविक एकत्र येऊन सामाजिक सलोखा वाढीस लागतो. कारागीर आणि कलाकारांना प्रोत्साहन मिळून प्राचीन कला-संस्कृतीचे रक्षणही त्यामुळे होते असे त्यांनी सांगितले.

Hill Stations Near Shirdi To Enchant Your Senses In Hindi | hill stations  near shirdi to enchant your senses | HerZindagiस्त्रोत.सोशल मिडिया.

शिर्डीतील पर्यटन वाढीसाठी केंद्र सरकारचे सहाय्य आणि एमटीडीसीचे प्रयत्न.

शिर्डीतील पर्यटन वाढीसाठी केंद्र सरकारचे सहाय्य आणि एमटीडीसीचे प्रयत्न’ या विषयावर एमटीडीसी, नाशिक विभागाचे प्रादेशिक व्यवस्थापक जगदीश चव्हाण यांचे सादरीकरण झाले. एमटीडीसीच्या ब्रेड अँड ब्रेकफास्ट योजनेअंतर्गत स्थानिक रहिवाशांना रोजगाराची संधी देण्यात येते. यामध्ये एमटीडीसी पोहोचू शकलेल्या भागात स्थानिकांच्या घरांचे रुपांतर हॉटेलमध्ये करण्यात येते, कोकण परिसरात याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. सध्या महाराष्ट्रात कोणत्याही इतर खासगी कंपन्यांपेक्षाही सर्वाधिक रेसॉर्ट हे एमटीडीसीकडे आहेत. अतिथी देवो भवं, हे ब्रीद पाळून एमटीडीसी काम करत आहे, असे त्यांनी सांगितले. 

हिंदी पत्रकारिता दिवस पर जाने महिला पत्रकारों का संघर्ष कितना लंबास्त्रोत.सोशल मिडिया.

विकास पत्रकारिता आणि त्याचे ग्रामीण भागातील महत्त्व

 सोलापूर विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे निवृत्त विभागप्रमुख डॉ. रविंद्र चिंचोलकर यांचे विकास पत्रकारिता आणि त्याचे ग्रामीण भागातील महत्त्व या विषयावर सत्र झाले. ते म्हणाले  स्वातंत्र्यपूर्व काळात प्रत्येक स्वातंत्र्यसैनिकांनी वर्तमानपत्रांच्या माध्यमातून लढा उभा केला होता. आताच्या काळात त्याला विकासाचे स्वरुप देण्याची आवश्यकता आहे. सर्वसामान्यांच्या दुःखांची मांडणी योग्यरित्या करून त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आणणे त्यांच्या विकासासाठी प्रशासनाकडे पाठपुरावा करणे याला विकास पत्रकारिता म्हटले जाते.असे त्यांनी यावेळी सांगितले.

 

 शिर्डीतील पर्यटन विकास : बँकांची भूमिका.

शिर्डीतील सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे वरीष्ठ प्रबंधक प्रमोद दहिफळे मार्गदर्शन केले. केंद्र सरकारमार्फत देण्यात येत असलेल्या पीएम मुद्रा, पीएम स्वनिधी यांसारख्या योजनांचा लाभ बँकांकडून कशा प्रकारे मिळवावा, याची माहिती त्यांनी दिली. यावेळी केंद्र सरकारच्या पीएमएफएमई योजनेच्या लाभार्थी पल्लवी जगताप यांनी आपल्या मसाले, पापड आणि शेवयांच्या व्यवसायाला मिळालेल्या कर्जाबाबत अनुभव कथन केले आणि समाधानही व्यक्त केले. शेवटच्या सत्रात ‘ग्रामीण भागातील माध्यमांचे विकासात्मक संवादात योगदान आणि जनसेवेसाठी माध्यमांना पीआयबीची कशी मदत होईल या विषयावर पत्र सूचना कार्यालयाचे माध्यम अधिकारी हर्षल आकुडे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी श्री. आकुडे यांनी पत्रकार कल्याण योजना आणि पीआयबी फॅक्ट चेक यांच्याविषयीही सविस्तर माहिती दिली. 

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article अहमदनगर महानगर पालिकेच्या माजी.नगरसेविका सुवर्णा दत्ता जाधव यांना पितृशोक ……
Next Article जिल्ह्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडु निर्माण करण्यासाठी आमदार जगतापांची धावपळ, जगतापांच्या पाठपुराव्यामुळे वाडियापार्क क्रीडा संकुलला एकूण ५२ तर पहिल्या टप्प्यात १५ कोटींचा निधी मंजूर.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?