अंगावरील दागिने विकून थाटला संसार…..
पूजाने अंगावरील सोन्याचे दागिने विकून भाड्याने खोली घेतली. घरात अन्न-धान्य भरले. विद्यार्थी जीवन जगत असलेला विक्रम केटरिंग काम करु लागला तर पूजा एका खासगी कार्यालयात काम करु लागली. दोघांचाही संसार सुरु होता. पलायन केल्यानंतर दोन महिन्यांपर्यंत पोलिसांना त्यांचा शोध लागला नाही. दुसरीकडे विक्रमच्या आई-वडिलांनी मुलाचे अपहरण केल्याची तक्रार केली त्यानंतर वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांच्या पथकाने तांत्रिक तपास करुन बालाघाटचा पत्ता मिळवला. तेथे छापा घालून दोघांना ताब्यात घेतले. अल्पवयीन विक्रमला पालकांच्या ताब्यात दिले तर पूजला पतीच्या ताब्यात दिले. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.