जालना : वाळू माफियांचा हैदोस किंवा वाळू माफियांकडून सातत्याने वाळू उपसा करताना गुंडगिरी व दहशत माजवली जाते. अनेकदा महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांवर देखील वाळू माफियांकडून हल्ला, मारहाण करण्यात आल्याच्या घटना घडलेल्या आहेत. वाळू हा विषय पोलीस खात्यापेक्षा महसूल खात्याच्या अधिपत्याखाली येतो. त्यामुळे वाळू माफियांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महसूल अधिकाऱ्यांना बहुतांशवेळा जीव मुठीत धरुन कारवाई करावी लागते. नुकतेच जालना जिल्ह्यातील परतूरच्या महिला तहसीलदारावर वाळूमाफियांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. प्रतिभा गोरे असं या महिला तहसिलदाराचे नाव असून त्यांच्या फिर्यादीवरुन वाळू माफियांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. येथील दुधना नदीपात्रात वाळू माफियावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या तहसीलदारांवर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. या प्रकरणी परतुर पोलीस ठाण्यात ७ आरोपीन विरोधात गुन्हा दाखल झाला असून आरोपी अद्याप फरार आहेत. स्वतः तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी परतुर पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे. जालन्यातील परतूर येथे वाळूमाफीयाने महिला तहसीलदारवर हल्ला केला आहे. परतूर येथील दुधना नदी पात्रात अवैध वाळूचं उत्खनन करणाऱ्यावर मध्यरात्री एक ते दीड वाजताच्या सुमारास कारवाईसाठी गेलेल्या महिला तहसीलदारावर हा हल्ला करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेचे व्हिडिओ समोर आले आहेत. याप्रकरणी, आता परतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अखिल बिल्डर, इलियास कुरेशी,अमजत कुरेशी, इरफान शेख, जुनेद व इतर २ आरोपींविरुद्ध परतुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. दरम्यान, आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे. स्वतः परतूरच्या तहसीलदार प्रतिभा गोरे यांनी परतुर पोलीस ठाण्यात फिर्याद देऊन तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान तहसीलदारांवर झालेल्या वाळू माफियांच्या हल्ल्याप्रकरणी आमदार बबनराव लोणीकर यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला आहे.