मुलाचा जन्मदाखला मागितला म्हणून त्या महिलेला सासरच्या लोकांकडून मारहाण नवर्यासह पाच जणांविरूद्ध गुन्हा दाखल………..
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | CRIME NEWS | BEATING A WOMAN IN KOPARGAON FILED A CASE IN THE POLICE STATION | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मुलाला शाळेत दाखल करण्यासाठी मुलाचा जन्माचा दाखला सासरी जाऊन मागितला असता त्याचा राग आल्याने आरोपी सासरा भानुदास लक्ष्मण मांजरे, सासू सुमन भानुदास मांजरे, मारुती भानुदास मांजरे, सुरेखा मारुती मांजरे, नवरा कैलास भानुदास मांजरे यांनी एकत्र येऊन तीस शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत कोपरगाव पोलिसांत पायल कैलास मांजरे हिने गुन्हा दाखल केला आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
सासरच्या लोकांना आपल्या जन्मदाखला मागितला असता सासरच्या मंडळींना राग आला.
पायलचे तिचा नवरा आणि सासरच्या मंडळीसोबत काही कारणावरून वाद आहेत. याबाबत न्यायालयात दोषारोप पत्र दाखल असून न्यायालयातून पायल काही दिवसांपूर्वी सासरी आली होती. मात्र काही दिवस ती सासरी नांदली. पुन्हा त्यांच्यात वितुष्ट निर्माण झाल्याने ती पुन्हा माहेरी गेली होती. या जोडप्यास एक अपत्य असून त्यास शाळेत घालण्यासाठी पायल या अपत्याचा शाळेचा दाखला आणण्यासाठी सासरी गेली होती. तिने सासरच्या लोकांना आपल्या जन्मदाखला मागितला असता सासरच्या मंडळींना राग आला.आरोपी सासरा भानुदास लक्ष्मण मांजरे, सासू सुमन भानुदास मांजरे, मारुती भानुदास मांजरे, सुरेखा मारुती मांजरे, नवरा कैलास भानुदास मांजरे आदीनी एकत्र येऊन पायलला शिवीगाळ करून काठीने मारहाण केली. जीवे मारण्याची धमकी दिली आहे. दरम्यान या प्रकरणाने ती घाबरून जाऊन तिने कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात धाव घेऊन वरील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्र.१९५ /२०२४ भा.द.वि. कलम १४३ १४७,१४८,१४९,३२४,३२३, ५०४,५०६,म.पो.कायदा कलम ३७ (१) (३)१३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार आंधळे करत आहे.