By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > महाराष्ट्र > आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल.
महाराष्ट्र

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल.

Last updated: 2024/10/21 at 12:19 PM
By BHAIYYASAHEB BOXER 1 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR

आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी शिवसेना शिंदे गटाचे नेते, कळमनुरी विधानसभेचे आमदार संतोष बांगर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काही दिवसांपूर्वीच आमदार संतोष बांगर यांनी मतदारांना पैसे वाटण्याचे आमिष दिले होते. याप्रकरणी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. ज्यानंतर कळमनुरी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्यात विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. १५ ऑक्टोबर रोजी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकींची घोषणा केली. एकीकडे निवडणुकांसाठी प्रचार जोर धरत असतानाच आदर्श आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी शिंदें गटाच्या आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आमदार संतोष बांगर यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

Maharashtra Political Crisis: “बांगर साहेब, मला ५० लाखांची गरज होती, आता तर तुम्हाला ५० कोटी मिळालेत ना!” - Marathi News | eknath shinde group rebel mla santosh bangar phone call recording viral(संग्रहित दृश्य.)

निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला गुन्हा दाखल.

काही दिवसांपूर्वीच हिंगोलीच्या कळमनुरी शहरात संतोष बांगर यांनी कार्यकर्त्यांना फोन पे द्वारे पैसे पाठवतो असे विधान केले होते. निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर संतोष बांगर यांच्या विरोधात तक्रार दाखल करत गुन्हा दाखल केला आहे.विधानसभा निवडणुकांच्या प्रचारादरम्यान बोलताना संतोष बांगर यांनी मतदारांना पैसे पाठवण्याचे विधान केले होते. बाहेरगावी राहणाऱ्या मतदारांची यादी दोन दिवसात आली पाहिजे. त्यांना आणण्यासाठी गाड्या करा. त्यासाठी काय लागेल ते सांगा. तसं फोन पे करा, असे संतोष बांगर म्हणाले होते. यावरुनच निवडणूक आयोगाने त्यांना मोठा दणका दिला आहे.

You Might Also Like

२५०० कोटींची फसवणूक,महाराष्ट्रातील सर्वात मोठा घोटाळा ; २९ लाख ८७ हजार ४२२ गुंतवणूकदार, ५६आरोपी अन् ३१ गुन्हे,गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले…..

डॉक्टरची कोरोना काळातील ऑडिओ क्लिप व्हायरल ; म्हणाले पेशंटला मारुन टाक की, कशाला ठेवलेय उगीच ? ऑक्सिजन जास्त लागतोय, तुम्हाला…

हगवणे पिता-पुत्रास पाच दिवसांची पोलीस कोठडी ; भाजपच्या महिला आक्रमक, आरोपींवर फेकले टोमॅटो.

वैष्णवीचं दहा महिन्यांचं बाळ घेऊन निलेश चव्हाण फरार ? बंदूकधारी चव्हाणकडे सध्या हे बाळ आहे. मात्र वारंवार बंदुकीला हात लावून तुमचा अन बाळाचा काही संबंध नाही म्हणत……

अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसाठी बनावट कागदपत्रांच्या आधारे प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द करून त्यांच्यावर गुन्हा दाखल होणार?

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर सलमान खानचे ते वक्तव्य चर्चेत, सलमान म्हणाला मला यायचं नव्हत पण……
Next Article शहरात घरफोड्या वाढल्या कोतवाली आणि तोफखाना पोलीस ठाण्यात स्वतंत्र गुन्हे दाखल.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?