सध्या चित्रपटांच्या व सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगाचे चित्र आपल्या समोर उभे आहे.पूर्वीच्या काळात गुन्हा करायला लोक घाबरत होते.कायद्याचा धाक होता.सोशल मिडिया व वेब सिरीजच्या माध्यमातून गुन्हा करण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचे समजते.अनेक चित्रपटांमध्ये गुन्हा केल्यांनतर पुरावे कशे नष्ट केले जातात हे दाखवले जाते. अजय देवगण अभिनित दृश्यममध्ये देखील अत्यंत सहजपणे पोलिसांना अजय देवगण कसे गंडवतो हे दाखवण्यात आले होते.म्हणून सध्या चित्रपटांच्या कथांचे परिणाम युवा पिढीवर होत असल्याचे समजते.
अत्यंत शिताफीने कट कसा रचायचा,भाईगिरी कशी करायची याचे ज्ञान अल्पवयीन वयातच येते असे म्हणणे वावगे ठरणार नाही.त्यात सध्या राजकारणाचे देखील उत्तम उदाहरण युवा पिढी समोर आहे.सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलल्यानंतर अनेक यंत्रणांचा वापर करून चौकशी होते.एखाद्या खोट्या गुन्ह्यात अडकवले जाते असा आरोप विरोधी बाकावरील राजकीय नेते मंडळी करत असतात.
एखाद्या तरुणावर एखादा गुन्हा दाखल झाला तर त्याला शासकीय नोकरी मिळत नाही. आपले स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नांत असलेले तरुण कोणत्याही बेकायदेशीर उपक्रमांमध्ये आपला वेळ वाया घालत नाही. मात्र काही तरुणांना भाईगिरीच करायची असते म्हणून वेगवेगळ्या युक्त्या ते लढवत असतात.याचं उत्तम उदाहरण एका न्यायधीशावर झालेल्या खोट्या गुन्ह्यातून समोर आलं आहे. २००५ मध्ये मालेगावात कार्यरत असलेले न्यायाधीश बाळासाहेब भारस्कर यांच्यावर काही पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायाधीश बाळासाहेब भारस्कर यांना काही समाजकंटकाने रेस्ट हाऊसमधून पकडून नेले व सांगीतले की अॅडव्होकेट नूर जहाँ या महिलेबरोबर तुमचे संबंध आहेत.त्यामुळे तुम्ही तिच्यासोबत लग्न करा.त्यावेळी बाळासाहेब भारस्कर यांनी त्याला विरोध करत त्यांनी सांगितले की हे सर्व खोटं आहे. मी असे कृत्य केलेले नाही. त्यावेळी न्यायाधीश भारस्कर यांना मारहाण देखील करण्यात आली.पोलिसांनी भारस्कर यांच्या विरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या घटनेमुळे भारस्कर यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले. त्यांना न्यायाधीश पदावरून देखील टर्मिनेट करण्यात आलं. ज्या गावात ते राहत होते ते गाव सोडून त्यांना भिवंडी येथे जाव लागलं आणि अनेक दिवस भारस्करांना त्यांची ओळख लपून राहावे लागत होते. मुलांच्या शिक्षणात देखील नुकसान झालं. अनेक यातना त्यांना सहन कराव्या लागल्या मात्र या संपूर्ण प्रकरणात मी लढत राहणार व सत्य समोर आणणार अशी जिद्द भारस्कर यांनी केली होती. त्याचा परिणाम हायकोर्टाने २०१७ मध्ये त्यांना बलात्काराच्या खोटा गुन्ह्यातून दोष मुक्त करण्यात आलं. त्यानंतर भारस्कर यांनी दोषी पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात तत्कालीन मुख्यमंत्री प्रशासन तसेच राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती.
न्यायाधीशालाच बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात गोवले.
पाच जणांविरोधात शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करा आणि दखलपात्र गुन्हा असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा (एफआयआर) नोंदवा असे निर्देश न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती श्रीहरी डावरे व सदस्य उमाकांत मिटकर यांच्या खंडपीठाने निकालात दिले आहेत. न्यायाधीशालाच बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याच्या प्रकरणात राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाने वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यासह तीन निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक तथा महाराष्ट्र सुरक्षा बलाचे व्यवस्थापकीय संचालक राजवर्धन सिंह व दहशतवाद विरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल कुंभारे या २ वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांच्यासह सेवानिवृत्त तत्कालीन पोलिस निरीक्षक तडवी, उपविभागीय पोलिस अधिकारी ए एस पवळ, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी निंबाळकर यांच्यावर कारवाईचे आदेश राज्य सरकारला दिल्याने खळबळ उडाली आहे.
महिलेच्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झालाच नसल्याचे स्पष्ट
त्या महिलेच्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झालाच नसल्याचे स्पष्ट झाले, तिने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या जबाबात आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयातील भारस्कर यांच्या याचिकेत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.बाळासाहेब भारस्कर यांचा काहीच गुन्हा नाही आणि त्यांनी काहीच त्रास दिलेला नाही, असे खुद्द फिर्यादी महिलेने सांगूनही तिच्यावर एफआयआरसाठी दबाव टाकण्यात आला.
भारस्कर यांचे करिअर नाहक उद्ध्वस्त झाले.
इतकेच नव्हे तर खुद्द पोलिसांनीच नंतर कोणताही दखलपात्र गुन्हा घडला नसल्याचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर मान्य केले. विश्रामगृहातील खानसामा रवींद्र शिंदेनेही भारस्कर यांच्याच बाजूने जबाब नोंदवला. या साऱ्याची तपासणी करून उच्च न्यायालयाने ३ मे २०१७ रोजी भारस्कर यांना पूर्णपणे आरोपमुक्त केले. इतकेच नव्हे तर या साऱ्या धक्कादायक प्रकाराने भारस्कर यांचे करिअर नाहक उद्ध्वस्त झाले ‘असे निरीक्षणही न्यायमूर्ती साधना जाधव यांनी निर्णयात नोंदवले. या निर्णयानंतरच भारस्कर यांनी न्यायाधिकरणात पोलिसांविरोधात हा तक्रार अर्ज दाखल केला होता.