By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: चक्क न्यायाधीशांवरच खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > चक्क न्यायाधीशांवरच खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश.
अहमदनगरक्राईम न्यूज

चक्क न्यायाधीशांवरच खोटा बलात्काराचा गुन्हा दाखल. भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश.

TIMES OF AHMEDNAGAR | JUDGE | RAPE | FALSE CRIME AGAINST JUDGE | CRIMINAL | CORRUPT OFFICIALS | ACTION AGAINST RETIRED OFFICERS | COURT ORDER |

Last updated: 2023/12/26 at 11:17 PM
By BHAIYYASAHEB BOXER 6 Min Read
Share
SHARE

 

 

सध्या चित्रपटांच्या व सोशल मिडीयाच्या माध्यमातून जगाचे चित्र आपल्या समोर उभे आहे.पूर्वीच्या काळात गुन्हा करायला लोक घाबरत होते.कायद्याचा धाक होता.सोशल  मिडिया व वेब सिरीजच्या माध्यमातून गुन्हा करण्यास प्रोत्साहन मिळत असल्याचे समजते.अनेक चित्रपटांमध्ये गुन्हा केल्यांनतर पुरावे कशे नष्ट केले जातात हे दाखवले जाते. अजय देवगण अभिनित दृश्यममध्ये देखील अत्यंत सहजपणे पोलिसांना अजय देवगण कसे गंडवतो हे दाखवण्यात आले होते.म्हणून सध्या चित्रपटांच्या कथांचे परिणाम युवा पिढीवर होत असल्याचे समजते.

 

अत्यंत शिताफीने कट कसा रचायचा,भाईगिरी कशी करायची याचे ज्ञान अल्पवयीन वयातच येते असे म्हणणे वावगे ठरणार नाही.त्यात सध्या राजकारणाचे देखील उत्तम उदाहरण युवा पिढी समोर आहे.सत्ताधारी पक्षाच्या विरोधात बोलल्यानंतर अनेक यंत्रणांचा वापर करून चौकशी होते.एखाद्या खोट्या गुन्ह्यात अडकवले जाते असा आरोप विरोधी बाकावरील राजकीय नेते मंडळी करत असतात.

एखाद्या तरुणावर एखादा गुन्हा दाखल झाला तर त्याला शासकीय नोकरी मिळत नाही. आपले स्वप्न साकार करण्याच्या प्रयत्नांत असलेले तरुण कोणत्याही बेकायदेशीर उपक्रमांमध्ये आपला वेळ वाया घालत नाही. मात्र काही तरुणांना भाईगिरीच करायची असते म्हणून वेगवेगळ्या युक्त्या ते लढवत असतात.याचं उत्तम उदाहरण एका न्यायधीशावर झालेल्या खोट्या गुन्ह्यातून समोर आलं आहे. २००५ मध्ये मालेगावात कार्यरत असलेले न्यायाधीश बाळासाहेब भारस्कर यांच्यावर काही पोलीस अधिकाऱ्यांच्या मदतीने बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्यात आला. न्यायाधीश बाळासाहेब भारस्कर यांना काही समाजकंटकाने रेस्ट हाऊसमधून पकडून नेले व सांगीतले की अॅडव्होकेट नूर जहाँ या महिलेबरोबर तुमचे संबंध आहेत.त्यामुळे तुम्ही तिच्यासोबत लग्न करा.त्यावेळी बाळासाहेब भारस्कर यांनी त्याला विरोध करत त्यांनी सांगितले की हे सर्व खोटं आहे. मी असे कृत्य केलेले नाही. त्यावेळी न्यायाधीश भारस्कर यांना मारहाण देखील करण्यात आली.पोलिसांनी भारस्कर यांच्या विरोधात बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली. या घटनेमुळे भारस्कर यांचे संपूर्ण कुटुंब उध्वस्त झाले. त्यांना न्यायाधीश पदावरून देखील टर्मिनेट करण्यात आलं. ज्या गावात ते राहत होते ते गाव सोडून त्यांना भिवंडी येथे जाव लागलं आणि अनेक दिवस भारस्करांना  त्यांची ओळख लपून राहावे लागत होते. मुलांच्या शिक्षणात देखील नुकसान झालं. अनेक यातना त्यांना सहन कराव्या लागल्या मात्र या संपूर्ण प्रकरणात मी लढत राहणार व सत्य समोर आणणार अशी जिद्द भारस्कर यांनी केली होती. त्याचा परिणाम हायकोर्टाने २०१७ मध्ये त्यांना बलात्काराच्या खोटा गुन्ह्यातून दोष मुक्त करण्यात आलं. त्यानंतर भारस्कर यांनी दोषी पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात तत्कालीन मुख्यमंत्री प्रशासन तसेच राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे तक्रार दाखल केली होती.

 

न्यायाधीशालाच बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात गोवले.

पाच जणांविरोधात शिस्तभंगाची कार्यवाही सुरू करा आणि दखलपात्र गुन्हा असल्याचे निष्पन्न झाल्यास त्यांच्याविरोधात गुन्हा (एफआयआर) नोंदवा असे निर्देश न्यायाधिकरणाचे अध्यक्ष न्यायमूर्ती श्रीहरी डावरे व सदस्य उमाकांत मिटकर यांच्या खंडपीठाने निकालात दिले आहेत. न्यायाधीशालाच बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात गोवण्यात आल्याच्या प्रकरणात राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणाने  वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यासह तीन निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारला दिले आहेत. अतिरिक्त पोलीस महासंचालक तथा महाराष्ट्र सुरक्षा बलाचे व्यवस्थापकीय संचालक राजवर्धन सिंह व दहशतवाद विरोधी पथकाचे विशेष पोलीस महानिरीक्षक अनिल कुंभारे या २ वरिष्ठ आयपीएस अधिकारी यांच्यासह सेवानिवृत्त तत्कालीन पोलिस निरीक्षक तडवी, उपविभागीय पोलिस अधिकारी ए एस पवळ, सहायक पोलिस निरीक्षक संभाजी निंबाळकर यांच्यावर कारवाईचे आदेश राज्य सरकारला दिल्याने खळबळ उडाली आहे.

 

महिलेच्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झालाच नसल्याचे स्पष्ट

 त्या महिलेच्या वैद्यकीय तपासणीत बलात्कार झालाच नसल्याचे स्पष्ट झाले, तिने न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर नोंदवलेल्या जबाबात आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयातील भारस्कर यांच्या याचिकेत दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रातही सर्व आरोप खोटे असल्याचे स्पष्ट सांगितले आहे.बाळासाहेब भारस्कर यांचा काहीच गुन्हा नाही आणि त्यांनी काहीच त्रास दिलेला नाही, असे खुद्द फिर्यादी महिलेने सांगूनही तिच्यावर एफआयआरसाठी दबाव टाकण्यात आला.

 

 

भारस्कर यांचे करिअर नाहक उद्ध्वस्त झाले.

इतकेच नव्हे तर खुद्द पोलिसांनीच नंतर कोणताही दखलपात्र गुन्हा घडला नसल्याचे उच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रावर मान्य केले. विश्रामगृहातील खानसामा रवींद्र शिंदेनेही भारस्कर यांच्याच बाजूने जबाब नोंदवला. या साऱ्याची तपासणी करून उच्च न्यायालयाने ३ मे २०१७ रोजी भारस्कर यांना पूर्णपणे आरोपमुक्त केले. इतकेच नव्हे तर या साऱ्या धक्कादायक प्रकाराने भारस्कर यांचे करिअर नाहक उद्ध्वस्त झाले ‘असे निरीक्षणही न्यायमूर्ती साधना जाधव यांनी निर्णयात नोंदवले. या निर्णयानंतरच भारस्कर यांनी न्यायाधिकरणात पोलिसांविरोधात हा तक्रार अर्ज दाखल केला होता.

 

 

काय घडल होत ?

विश्रामगृहाच्या पहिल्या मजल्यावरून अचानक आरडाओरड ऐकू आल्यानंतर भारस्कर तिथे गेले होते. चार पाच तरुण एका बुरखाधारी महिलेला बेदम मारहाण करत असल्याचे त्यांनी पाहिले. त्यामुळे त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र तरुणांनी भारस्कर यांनाच मारहाण सुरू केली. नंतर त्यांच्यावरच आरोप लावून महिलेसोबत त्यांनाही रिक्षात डांबून नेले. त्यानंतर भारस्कर यांच्यावर संशय घेत बलात्काराचा खोटा आरोप लावून दोन समुदायांमध्ये तणाव निर्माण करण्याची भीती दाखवण्यात आली. जमाव जमल्याने पोलिसही मोठ्या प्रमाणात तेथे पोहोचले. त्यानंतर महिलेला भारस्कर यांच्याविरोधात एफआयआर नोंदवण्यास भाग पाडण्यात आले. मी न्यायाधीश आहे, माझ्यावरील आरोप पूर्णपणे खोटा आहे. न्यायाधीशाला अटक करण्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने घालून दिलेल्या नियमांचेही पालन झालेले नाही असे भारस्कर यांनी निदर्शनास आणूनही पोलिसांनी त्याकडे दुर्लक्ष केले.

तत्कालीन दिवाणी न्यायाधीश बाळासाहेब हिरालाल भारस्कर हे १७ वर्षांपूर्वी आपल्या कुटुंबीयांसोबत गोदावरी विश्रामगृहात तात्पुरते राहत असताना ७ मार्च २००५ रोजी त्यांच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार घडला होता. मालेगावमधील दोन समुदायांमध्ये तणावपूर्ण वातावरण होऊन कायदा – सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असे कारण देत कथित पीडित महिला वकिलाला माझ्याविरोधात बलात्काराचा खोटा एफआयआर नोंदवण्यास भाग पाडण्यात आले अशी कैफियत भारस्कर यांनी न्यायाधिकरणासमोर मांडली होती.आमचा हा अहवाल प्राथमिक चौकशी अहवाल म्हणून स्वीकारून सरकारने या अधिकाऱ्यांविरोधात महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम २२ आर (क) अन्वये शिस्तभंगाची कारवाई किंवा अन्य योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. तसेच आमच्या या निकालातून सकृतदर्शनी दखलपात्र गुन्हा असल्याचे उघड झाल्यास या अधिकाऱ्यांविरोधात एफआयआर नोंदवावा असे न्यायाधिकरणाने आदेशात म्हटले आहे. अशी माहिती बाळासाहेब भारस्कर यांनी दिली आहे.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink1
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article अॅड. हर्षद चावलांवर प्राणघातक हल्ला,किरण काळेंवर गंभीर आरोप. हॉटेल वैष्णवराज येथे चालतंय तरी काय ?
Next Article अरबाज खानचे दुसरे लग्न झाले,पण सलमान खान तू पहिले लग्न तरी कर चाहत्यांचा पुन्हा सल्ला.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?