Reading:नवरीने माप ओलांडून घरात प्रवेश करताच नवरदेवाने बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडले, सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या नवविवाहित जोडप्यावर दुःखाचा डोंगर
नवरीने माप ओलांडून घरात प्रवेश करताच नवरदेवाने बायकोच्या मांडीवर डोकं ठेवून प्राण सोडले, सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या नवविवाहित जोडप्यावर दुःखाचा डोंगर
गडचिरोली : घरातील आनंदाच्या वातावरणात पार पडलेल्या लग्नसोहळ्यानंतर अवघ्या दोन दिवसांत नवरदेवाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली आहे. सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या नवविवाहित जोडप्यावर दुर्दैवाचा डोंगर कोसळल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वडिलांचे छत्र आधीच हरपलेलं. एकट्या आईला खूप कामं करावं लागत म्हणून मुलाने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न आणि स्वागत समारंभही आटोपला. परंतु नियतीने काहीतरी वेगळंच ठरवलं होतं. अचानक प्रकृती बिघडली आणि हळद सुकण्यापूर्वीच नववधूच्या मांडीवर डोके ठेवत नवरदेवाचा मृत्यू झाला. हृदय पिळवटून टाकणारी ही घटना कोरची तालुक्यातील गहाणेगाटा येथे घडली. नारायण कंवलसिंह बोगा (२६ वर्षे) असे मृत नवविवाहित युवकाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार लग्नाच्या दोन दिवसानंतरच अचानक नारायणची प्रकृती बिघडली. त्याला हृदयविकाराच्या झटका आला त्यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही काळीज पिळवटू टाकणारी घटना गडचिरोली जिल्ह्यात घडली आहे. दोन दिवसांपूर्वी जिथे लग्नाची लगबग झाली. सनई, चौघडे वाजले, ज्या घरात नववधू आली, त्याच घरातून नवरदेवाला असा कायमचा निरोप द्यावा लागला. नवरदेव कुंवलसिंह बोगायाच्या वडिलांचे छत्र आधीच हरपलेलं. पितृछत्र हरवल्यानंतर आईला खूप काम करावे लागतात म्हणून त्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्न ठरलं मोठ्या थाटामाटात लग्नसोहळा अन् स्वागत समारंभही झाला. एकीकडे नवदांपत्य सुखी संसाराची स्वप्ने पाहत असतानाच नियतीने घाला घातला. लग्नाच्या दोन दिवसानंतर नारायण कंवलसिंह बोगा याची प्रकृती अचानक बिघडली. त्याला उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्याआधीच त्याने नववधूच्या मांडीवर डोकं ठेवून जीव सोडला होता. नारायण बोगा याचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या भयंकर घटनेने लग्नघरात शोककळा पसरली. लग्नानंतर दोन दिवसातच नारायणला मृत्यूने गाठल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
(संग्रहित दृश्य.)
नारायण मनमिळवू आणि शांत स्वभावाचा…
नारायण बोगा हा अत्यंत साधा, शांत आणि मनमिळावू स्वभावाचा होता. १५ वर्षांपूर्वी वडिलांचे छ्त्र हरपलं होतं. तेव्हापासून घरी आई आणि तो दोघेच होते. त्याच्या आईने मोठ्या कष्टाने त्याला वाढवलं. आता आईच्या मदतीला चांगली सून हवी असं ठरवून त्याने यंदा लग्न करण्याचे ठरवले. आईनेच मुलगी पाहिली. दि.३० एप्रिला छत्तीसगड राज्यातील मानपूर-चौकी तालुक्यातील माधोपूर येथील फिरुराम कुमेटी यांची मुलगी दीपिका आणि त्याचा रितीरिवाजाप्रमाणे विवाह झाला. दुसऱ्या दिवशी दि.१ मे रोजी नारायणच्या गावी स्वागत समारंभही पार पडला. लग्राच्या दिवशी पोटात दुखत असल्याचे नारायणने नातेवाईकांना सांगितलं. त्यामुळे स्वागत समारंभाच्या दिवशी तो बेतकाठी येथील एका खासगी दवाखान्यात जाऊन उपचार घेऊन परत आला होता. त्याला बरं वाटतं होतं. मात्र, पुन्हा त्याच्या पोटात दुखू लागलं. त्यामुळे तो मित्र आणि नववधूला घेऊन स्वत:च मोटारसायकल चालवत वासळी येथील दवाखान्यात जाण्यास निघाला. परंतु बोरी गावाजवळ जाताच त्याची प्रकृती अधिकच बिघडली. दुचाकी थांबवून त्याने नववधूच्या मांडीवर डोके टेकलं आणि तिथेच प्राण सोडला. या घटनेमुळे गहाणेगाटा गावात हळहळ व्यक्त होत आहे.