TIMES OF NAGAR
अज्ञात मारेकऱ्याने एका मुस्लिम व्यक्तीची कट रचून शिरच्छेद करून निर्घृणपणे हत्या केल्याची हृदयद्रावक घटना ठाण्यातील भिंवंडीजवळील कारिवली परिसरात घडली. येथील खाडीशेजारील स्मशानामी पासून ५०० मिटर अंतरावरील घनदाट जंगलातून (दि.१६) एप्रिल रोजी मयत व्यक्तीचा मृतदेह हाती लागल्यानंतर घडलेल्या प्रकाराची माहिती समोर आली. फरहत अखलाक शेख असे हत्या झालेल्या ५२ वर्षीय व्यक्तीचं नाव असून या हत्येप्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांच्या विरोधात मयताच्या पत्नीच्या फिर्यादीवरून भोईवाडा पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलिस सदर गुन्ह्याचा कसोशीने तपास केला असता गुन्हे शाखा घटक २ च्या पोलिस पथकाला मारेकऱ्याच्या कारिवली गावातील राहत्या घरातून मुसक्या आवळण्यात यश आलं आहे. काजुकुमार रजेंदर राम (वय २१ ) असे ताब्यात घेऊन अटक केलेल्या मारेकऱ्याचे नाव आहे. अनैसर्गिक संबंधाच्या मागणीसाठी मयत फरहत हा मारेकरी काजूकुमार याला शिवीगाळ करत असल्याने त्याने या छळाला कंटाळून फरहतचं शीर धडापासून वेगळं करून निर्घृणपणे त्याची हत्या केल्याची कबूली पोलिसांना दिली आहे.