९ महिन्याच्या बाळाला विष देऊन आईने संपवली आपली जीवनयात्रा.
TIMES OF AHMEDNAGAR | CHANDRAPUR | CRIME NEWS | MOTHER COMMITTED SUICIDE BY POISONING HER 9-MONTH-OLD BABY | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
चंद्रपूर – ९ महिन्याच्या बाळाला विष देऊन आईने आपली जीवनयात्रा संपवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वरोरा तालुक्यातील शेगाव येथे ही घटना घडली आहे. यामुळे पल्लवी पारोधे ( वय २७) असे मृत महिलेचे नाव आहे. तिने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. तर ९ महिन्याच्या मुलाला आत्महत्येपूर्वी तिने विष दिल्याचे झाले निष्पन्न झाले आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
गळफास लावून आत्महत्या….
याबाबत अधिक माहिती अशी की जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शेगाव बु. येथील पारोधे कृषी केंद्राचे संचालक नितेश पारोधे यांचे दोन वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव येथील पल्लवी विनोद ढोके या युवतीसोबत लग्न झाले होते. त्यांना ९ महिन्याचा मुलगा आहे. मात्र पल्लवी पारोधे या विवाहितेने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. तर ९ महिन्याच्या मुलाला आत्महत्येपूर्वी तिने विष दिल्याने एकाच खळबळ उडाली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
९ महिन्याच्या मुलाला आत्महत्येपूर्वी दिले विष….
पारोधे यांचा मुलगा घरातच बेशुद्ध अवस्थेत तर पल्लवी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्या आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला आहे. पल्लवी हीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पाठवण्यात आला आहे. तर मुलाला चंद्रपुरातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी माहिती दिली आहे. घरगुती वादातून ही आत्महत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.