TIMES OF AHMEDNAGAR
कोणत्याही व्यक्तीवर अत्याचार झाला की तो व्यक्ती अगोदर पोलीस ठाण्यात पोहचतो आणि पोलिसांकडून न्यायाची अपेक्षा करतो.मात्र काही पोलीस न्याय न देता अत्याचार करत असल्याचा घटना वारंवार घडत असतात. पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे याने देखील तेच केले आहे. एका मुलीला लग्नाचे आमिष दाखवून त्या मुलीवर बलात्कार करुन तिच्याकडून महागड्या भेटवस्तू युवराज शिंदे घेत होता.तसेच पोलीस उपनिरीक्षक युवराज शिंदे याच्या पत्नीने युवतीला जातिवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी पुणे पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकासह त्याच्या पत्नीवर अॅट्रोसिटी अॅक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिकाऱ्यानेच अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे.
अॅ
याबाबत बाणेर येथे राहणाऱ्या ३२ वर्षीय युवतीने स्वारगेट पोलीस ठाण्यात रविवारी फिर्य़ाद दिली आहे. यावरुन पोलीस उपनिरीक्षक युवराज वामन शिंदे व त्याच्या पत्नीवर आयपीसी ३७६,३२३ ,५०४,५०६ , ३४ सह अनुसूचित जाती-जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी युवराज शिंदे मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. पीडित युवती आणि युवराज शिंदे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. युवराज शिंदे याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन केला. तिच्यासोबत गोड बोलुन तिच्याकडुन महागड्या भेटवस्तु घेतल्या. तसेच तिला पुणे शहरातील वेगवेगळ्या लॉजमध्ये नेऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. यानंतर आरोपीने तिच्यासोबत बोलणे टाळले.