गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये तेव्हा थांबलेल्या एअर होस्टेसचा विनयभंग व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न… – असीम सरोदे
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | CHIEF MINISTER | EKNATH SHINDE | SHIV SENA | CHIEF MINISTER EKNATH SHINDE'S POLITICAL COUP | ASIM SARODE | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
शिवसेनेला राम-राम ठोकून एकनाथ शिंदेंनी बंड पुकारले होते. यशस्वी बंडानंतर एकनाथ शिंदेंच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडली होती.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडलेल्या ४० आमदारांच्या बंडखोरीला बराच काळ उलटून गेला असताना त्यावेळी घडलेल्या घडामोडींबाबत वेगवेगळे दावे समोर येत असतात. वकील असीम सरोदे यांनी रविवारी धाराशीमध्ये झालेल्या ‘निर्भय बनो’ सभेत बोलताना शिंदे गटाच्या आमदारांचा उल्लेख करत गंभीर आरोप केले आहेत. तसेच यासंदर्भात चौकशी व्हायला हवी अशी मागणी असीम सरोदे यांनी केली आहे. त्यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिंदे गटाकडूनच त्यांच्यावर आरोप करण्यात आले आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया.
आमदारांना कुणी मारहाण केली ?
‘निर्भय बनो’ ची सभा धाराशिव येथे रविवारी संध्याकाळी पार पडली. यावेळी वकील असीम सरोदे यांनी शिंदे गटाच्या बंडावेळी गुवाहाटीमध्ये काय घडलं होतं ? यासंदर्भात काही दावे केले आहेत. गुवाहाटीतल्या हॉटेलमधून एक आमदार पळून गेले. ८ किलोमीटर गेल्यानंतर त्यांना पकडून आणलं गेलं. त्यांना हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या दोन आमदारांना कोणी मारहाण केली ? असा सवाल सरोदेंनी उपस्थित केला आहे.
सोशल मिडिया
एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला ?
असीम सरोदेंनी आपल्या भाषणात गुवाहाटीच्या हॉटेलमध्ये तेव्हा थांबलेल्या एअर होस्टेसचा विनयभंग व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न झाल्याचा गंभीर आरोप केला आहे. यासंदर्भात त्यांनी कोणत्याही आमदाराचं नाव घेतलेलं नसलं, तरी त्यांनी त्यावेळी त्या हॉटेलमध्ये थांबलेल्या शिंदे गटातील बंडखोर आमदारांचा यावेळी भाषण करताना उल्लेख केला आहे. गुवाहाटीत ज्या हॉटेलमध्ये हे सगळे थांबले होते तिथे इतर ग्राहकांना परवानगी नव्हती. पण स्पाईसजेट आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांनी त्यांच्यासाठी काही खोल्या तिथे बुक केल्या होत्या. त्या हॉटेलशी त्यांचं वर्षाचं कंत्राट होतं. तिथे वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहात होत्या. त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला. एअर होस्टेसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न कुणी केला ? हे महाराष्ट्रानं शोधलं पाहिजे. दारूच्या नशेत हे नेते झिंगत होते. हा पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू द्यायचा नाही,असं असीम सरोदे उपस्थित लोकांना उद्देशून म्हणाले.
स्त्रोत.सोशल मिडिया.
आम्ही त्या आरोपांना कवडीचीही किंमत देत नाही…
या आरोपांना प्रत्युत्तर देताना शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी असीम सरोदेंवरच आरोप केले आहेत. या पोपटांना काही ठिकाणी जागा मिळाली नाही. दोन आमदारांना मारहाण केली म्हणाले. एवढे सगळे आमदार सोबत होते. त्यांना जाऊन विचारा ना की कुणाला मारहाण झाली. आरोप केल्याशिवाय यांचं वजन वाढत नाही असा त्यांचा समज आहे. एका एअर होस्टेसचा विनयभंग केला म्हणाले. तुला कुठे स्वप्न पडलं ? सगळे पोलीस, सुरक्षा व्यवस्था, माध्यमं तिथे असताना असं कसं होईल ? दीड वर्षांनंतर याला जाग आली का ? अशा बेछूट आरोप करणाऱ्यांकडे लक्षच देऊ नये. गटाचे नेते खूश होतील या भावनेतून यांनी हे आरोप केले आहेत. आम्ही त्या आरोपांना कवडीचीही किंमत देत नाही असं संजय शिरसाट म्हणाले.