TIMES OF AHMEDNAGAR
केंद्र शासनाने हिट ॲन्ड रन केस प्रकरणी १० वर्ष शिक्षा आणि ७ लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात केली आहे.या कायद्याच्या विरोधात वाहन चालकांनी रास्तारोको आंदोलन केले आहे. हा कायदा अन्यायकारक असल्याचे सांगत वाहन चालकांनी रास्तारोको केला आहे.बंदोबस्ताला असलेल्या काही आंदोलकांनी पोलिसांवर हल्ला देखील केला आहे.वाहन चालकांच्या आंदोलनामुळे पेट्रोल पुरवठा देखील बंद झाला असल्याने अहमदनगर शहरातील सगळ्याच पेट्रोल पंपांवर एकच गर्दी पाहायला भेटली.
काय आहे नवीन कायदा.
केंद्र शासनाने हिट ॲन्ड रन केस प्रकरणी १० वर्ष शिक्षा आणि ७ लाख रुपये दंड अशी तरतूद कायद्यात केली आहे. या कायद्याच्या विरोधात बस, ट्रक चालकांनी अनेक ठिकाणी आंदोलन पुकारले आहे. हा कायदा ड्रायव्हरांच्या हिताचा नाही, असं वाहन चालकांचे म्हणणे आहे. तसेच नवीन कायद्यानुसार रस्त्यावर अपघात होऊन एखाद्या व्यक्तीने पळून जाऊन जखमी व्यक्तीला रस्त्यावर सोडल्यास त्याला १० वर्षांची शिक्षा होणार आहे. मात्र, अपघात घडवून आणणाऱ्या व्यक्तीने जखमी व्यक्तीला रुग्णालयात नेल्यास त्याची शिक्षा कमी होईल.