बंगळुरू : बंगळुरू येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. पोलिसांनी एका शिक्षिकेला अटक केली आहे. एका विद्यार्थींनीच्या वडिलांसोबत शिक्षिकेचे प्रेमसंबंध होते. त्यानंतर दोघांमध्ये शरीरसंबंधही निर्माण झाले. पण, विषय तेव्हा बिघडला जेव्हा शिक्षिकेने या दोघांचेच व्हिडीओ आणि फोटो दाखवून त्यांच्या प्रियकराला ब्लॅकमेल करणं सुरू केलं. ही घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. शिक्षिकेसह पोलिसांनी आणखी दोघांना अटक केली आहे. ज्यांचा या ब्लॅकमेल करण्यामध्ये सहभाग होता. शिक्षिकेचा हा कारनामा समोर आल्यानंतर पोलिसांनाही धक्का बसला आहे. बंगळुरू पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने या प्रकरणात कारवाई केली आहे. या संपूर्ण प्रकरणामध्ये २५ वर्षीय शिक्षिका श्रीदेवी रुदागी बरोबरच पोलिसांनी गणेश काळे (वय ३८ ) आणि सागर (वय २८) यांना अटक करण्यात आली आहे. या तिघांनी ब्लॅकमेल करून तक्रारदाराकडून (विद्यार्थीच्या वडिलांकडून) चार लाख रुपये घेतल्याचा आरोप केला आहे.
(संग्रहित दृश्य.)
आरोपी शिक्षिका अन् तक्रारदार कसे भेटले?
पोलिसांनी संबंधित प्रकरणात दिलेल्या माहितीनुसार पश्चिम बंगळुरूमध्ये पत्नी आणि ३ मुलीसह तक्रारदार राहतात. तक्रारदार व्यवसायिक आहेत. त्याची सर्वात छोटी मुलगी पाच वर्षांची आहे. २०२३ मध्ये मुलीचा शाळेत प्रवेश घेण्यासाठी तक्रारदार गेला असताना त्यावेळी शिक्षिका श्रीदेवी रुदागीसोबत ओळख झाली. प्रवेश प्रक्रियेदरम्यान ओळख झाल्यानंतर शिक्षिका श्रीदेवी रुदागी नंतरही तक्रारदार व्यक्तीच्या संपर्कात होती. ती कॉल आणि मेसेज करायची. नंतर ती व्हिडीओ कॉल करू लागली. हळू हळू दोघांमधील बोलणं चांगलंच वाढलं. त्यानंतर दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. दोघाचे शारिरीक संबंध आल्यानंतर श्रीदेवीने तक्रारदार व्यक्तीकडे १५ लाख रूपयांची मागणी केली. तक्रारदार व्यक्तीने शिक्षिकेला १५ लाख रूपये देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी शिक्षिका ५०हजार रुपये उसने घेण्याच्या बहाण्याने तक्रारदाराच्या थेट घरी गेली. यादरम्यान व्यवसायातील कमाई घटल्यामुळे तक्रारदाराने त्याची पत्नी आणि मुलींना परत गुजरातमधील आपल्या गावी पाठवण्याचं ठरवलं. त्यामुळे मुलीच्या शाळेचा दाखला काढायचा होता. मार्च महिन्याच्या सुरूवातीला हे घडले. जेव्हा तक्रारदार व्यक्ती शाळेत गेला तेव्हा तिथे शिक्षिका श्रीदेवी रुदागीच्या कार्यालयात काळे आणि सागर आधीपासूनच हजर होते. तक्रारदाराला आरोपींनी श्रीदेवीसोबतचे व्हिडीओ आणि फोटो दाखवले. त्यानंतर त्यांनी २० लाख रुपयांची मागणी केली. पैसे दिले नाही तर हे व्हिडीओ आणि फोटो त्यांच्या कुटुंबाला दाखवू अशी धमकीही त्यांनी दिली. त्यानंतर १५ लाख देण्याचं ठरलं. ठरल्याप्रमाणे १.९ लाख सुरूवातीला दिले. त्यानंतर त्यांची मागणी वाढतच राहिली. १७ मार्च रोजी श्रीदेवी रुदागीने तक्रारदाराला कॉल केला आणि म्हणाली की ५ लाख रुपये माजी पोलीस अधिकाऱ्यासाठी काळे आणि सागर साठी प्रत्येकी एक लाख रुपये आणि इतर ८ लाख रुपये असे एकत्रित सगळे पैसे पाठव. त्यानंतर तक्रारदाराने पोलिसांना संबंधित प्रकरणाची माहिती दिली. ही माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर गुन्हा दाखल करून त्यांनी तिघांना अटक करण्यात आली आहे. तिघांनाही न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. मात्र शिक्षिकेच्या या भयानक कृत्याने संताप व्यक्त केला जात आहे.