भारताच्या बहुतांश रस्त्यावर दारू प्यायल्यानंतर गोंधळ निर्माण करणारे लोक अनेक वेळा पाहिले गेले आहेत. दारूच्या नशेत काही लोक सार्वजनिक ठिकाणी गोंधळ घालतात, तर काही पोलिसांशी हुज्जत घालतात, याबाबतचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अलीकडे पुन्हा एकदा हे दृश्य उत्तर प्रदेशातील रस्त्यांवर दिसले. एका तरुणीने दारूच्या नशेत कपडे काढून रस्त्यावर गोंधळ घातला. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका मुलीने दारूच्या नशेत गोंधळ घातल्याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये मुलगी रस्त्याच्या मधोमध हाय व्होल्टेज ड्रामा करताना दिसत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून मुलीला शांत करण्याचा प्रयत्न केला असता ती पोलिसांच्या पाया पडू लागली. घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

स्त्रोत.सोशल मिडिया.

ते पाहून पोलिसांनी पाठ फिरवली.

व्हायरल व्हिडीओमध्ये कानपूरच्या गुमती या ठिकाणातील घटना असल्याचे सांगितिले जात आहे. व्हिडीओमध्ये एक मुलगी रस्त्याच्या मधोमध दारूच्या नशेत नाचताना दिसत आहे. तिने रस्ता अडवला असून मोठ्या संख्येने लोक या मुलीचे नाटक पाहत आहेत. मुलीच्या हायव्होल्टेज ड्रामाची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले, मात्र मुलगी दारूच्या नशेत होती. तिने पुरुष पोलिसांशी झटापट आणि धक्काबुक्की सुरू केली. हे पाहून पोलिस कर्मचारी मागे हटले. यानंतर लेडी कॉन्स्टेबलला बोलावण्यात आले. व्हिडीओमध्ये मुलगी आपली पँट खाली उतरवून उभी असल्याचे दिसत आहे. हे पाहून पोलिसांनी पाठ फिरवली. घटनास्थळी पोहोचलेल्या पुरुष पोलिसांनी मुलीला शांत करण्याचा प्रयत्न केला असता ती त्यांच्या पाया पडू लागली. मुलीने रस्त्याच्या मधोमध बराच वेळ गोंधळ घातला, त्यानंतर लेडी कॉन्स्टेबल आल्यावर तिला गाडीत बसवून घेऊन गेले. पोलिसांनी मुलीच्या नशेत असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला असून तिला नौबस्ता येथील वन स्टॉप सेंटरमध्ये पाठवण्यात आल्याचे सांगितले. मद्यधूंद तरुणी रस्त्याच्या मधोमध गोंधळ घालत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर विविध प्रकारच्या प्रतिक्रिया येत आहेत.

अशाप्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.

एकाने लिहिले की, या मुलीवर गोंधळ घालणे आणि रास्ता रोको केल्याप्रकरणी गुन्हा का दाखल करण्यात आला नाही ? दुसऱ्याने लिहिले की, कानपूरच्या मुली मुलांपेक्षा कमी नाहीत. एकाने लिहिले की, कानपूरच्या लोकांनी गोंधळ घालू नये, हे शक्य आहे का ? तर दुसऱ्याने लिहिले की, दीदी दारू पिऊन रस्त्यावर गोंधळ घालत असताना एवढ्या दुःखी का होत्या ? अशाप्रकारच्या प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत.