इंस्टाग्रामवर झालेले प्रेम पुढे नेण्यासाठी अडथळा येऊ नये यासाठी त्याने थेट खुनच केला.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR DISTRICT POLICE | CRIME NEWS | SANGAMNER MURDER NEWS | MURDER INCIDENT HAPPENED BECAUSE OF LOVE ON SOCIAL MEDIA | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
संगमनेर तालुक्यातील झोळे येथील वृद्धाच्या खुनाचा तपास लावण्यात येथील पोलिसांना अखेर यश आले आहे. गुन्हेगारी प्रवृत्तीच्या तरुणाने या वृद्धाचा खून केल्याचे पोलीस तपासात नुकतेच निष्पन्न झाले असून त्याला अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक असे कि झोळे गावातील साहेबराव उनवणे (वय ७७) यांचा मृतदेह (दि.५) ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास त्यांच्या नेहमीच्या झोपण्याच्या ठिकाणी पलंगावर आढळून आलेला होता. त्यांच्या डोक्यावर जखमा असल्याने हा हत्येचा प्रकार असल्याचा संशय पोलिसांना होता.
(संग्रहित दृश्य)
प्रकरणाचा तपास करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान….
पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर घटनास्थळीच एक पेनाने लिहिलेली चिठ्ठी देखील आढळून आली होती. त्या चिठ्ठीनुसार झारखंड मधील एका व्यक्तीने खंडणी घेऊन हा खुन केल्याचे नमूद केले होते. खुनाचा हा प्रकार गुंतागुंतीचा असल्याने या प्रकरणाचा तपास करण्याचे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. घटनास्थळी विशेष पोलीस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, पोलीस अधीक्षक राकेश ओला, पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी भेटी दिल्या होत्या. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार गुन्ह्याचा तपास करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांनी तीन पथके तयार केली होती. या पथकातील कर्मचाऱ्यांनी वेगवेगळ्या अंगाने खून प्रकरणाचा तपास केला. मयत व्यक्तीच्या कुटुंबातील सर्व सदस्य, त्याचे मित्रपरिवार, त्यांचे नातेवाईक तपासणे, त्याचप्रमाणे घटनास्थळ परिसरावर जाणाऱ्या सर्व रस्त्यांची सीसीटीव्ही फुटेज तपासणे, परिसरातील रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासणे,घटनास्थळी मिळून आलेल्या चिठ्ठीत नमूद केल्याप्रमाणे झारखंड मधील व्यक्तीचा तपास करण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे. घटनास्थळावर सापडलेल्या चिठ्ठीत उल्लेख असलेल्या झारखंड मधील व्यक्तींकडे पोलिसांनी तपास केला.
(संग्रहित दृश्य)
इंस्टाग्राम वरील प्रेम टिकवण्यासाठी खून….
तपासात भूषण कांताराम बाळे (रा. झोळे) याने हा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याने गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. झारखंड येथे असलेल्या एका मुलीशी या आरोपीची इंस्टाग्राम वरून ओळख झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले होते आणि हे इंस्टाग्राम वरील प्रेम टिकवण्यासाठी व पुढे नेण्यासाठी अडथळा येऊ नये, यासाठी या आरोपीने हा खून केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. दरम्यान या घटनेतील आरोपीवर यापूर्वी देखील खून व चोरीचे गुन्हे दाखल आहेत. वृद्धाच्या खून प्रकरणात त्याला कोणी सहकार्य केले आहे का ? याचा तपास पोलीस करीत आहे.