By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: तु मेला तरी कर्जाची वसुल करेल आशी धमकी सावकारांनी दिल्याने तरुणाने जीवन संपवले, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > क्राईम न्यूज > तु मेला तरी कर्जाची वसुल करेल आशी धमकी सावकारांनी दिल्याने तरुणाने जीवन संपवले, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.
क्राईम न्यूज

तु मेला तरी कर्जाची वसुल करेल आशी धमकी सावकारांनी दिल्याने तरुणाने जीवन संपवले, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल.

Last updated: 2024/10/16 at 11:10 AM
By BHAIYYASAHEB BOXER 5 Min Read
Share
SHARE

TIMES OF AHMEDNAGAR 

जामखेड तालुकयात  दोघांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करतोय आसा मजकूर डायरी मध्ये लिहुन आरणगाव येथील कालिदास अभिमन्यू मिसाळ वय ४० वर्ष या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या प्रकरणी तीन सावकारांन विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी व महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम नुसार जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आसुन यामध्ये एका महीला सावकाराचा आरोपीत समावेश आहे. या घटनेने जामखेड तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.

Indore Crime Round-Up: Youth Dies By Suicide Before Visiting Sister; Drug Peddler Held With 78 Gm Brown Sugar & More(संग्रहित दृश्य.)

तु मेला तरी कर्जाची वसुल करेल आशी धमकी …..

आलेश बाबुराव जगदाळे रा.जामखेड भगवान रामा जायभाय रा. वंजारवाडी जामखेड व शायरा नियमत सय्यद रा. पाटोदा गरडाचे  जामखेड आशा तीन आरोपी सावकारांची नावे आहे. या प्रकरणी मयताचा भाऊ जगदीश अभिमन्यू मिसाळ वय ४३ रा. आरणगाव याने वरील तीन आरोपींन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली आहे. गळफास घेऊन आत्महत्या केलेला तरुण कालिदास अभिमन्यू मिसाळ वय ४० वर्षे रा. हनुमान वस्ती आरणगाव जामखेड यास आरोपी हे दोन वर्षांपासून त्रास देत होते. यातील आरोपी आलेश बापुराव जगदाळे याच्या कडुन मयत कालिदास मिसाळ याने दोन वर्षापुर्वी शेतीच्या कामासाठी १ लाख रु कर्ज काढले होते. त्याच्या मोबदल्यात कालिदास हा वर्षभर आरोपीच्या ट्रॉक्टरवर ड्रायव्हर म्हणून काम करीत होता. हे काम करत आसताना एखाद्या दिवशी खाडे झाले तर त्याची भरपाई कालिदास कडुन वसुल केली जात होती. यानंतर कालिदास हा आजारी पडल्या नंतर त्याचा मुलगा प्रदिप कालिदास मिसाळ हा देखील ट्रॅक्टर ड्रायवर म्हणून कामाला जात होत. एक वर्ष कालिदास व त्याच्या मुलाने चार महीने आसे मिळुन दोघांनी चौदा महीने आरोपीकडे ड्रायव्हर म्हणून काम केले होते. तरीदेखील आरोपी आलेश जगदाळे हा एक लाख रुपये कर्जाचे व्याज व मुद्दल आसे मिळुन एकुण ३ लाख रुपयांची मागणी करत होता. तसेच घरी येऊन तु मेला तरी कर्जाची रक्कम तुझ्या मुलाकडून व बायकोकडुन वसुल करेल आशी धमकी देत होता.मागिल वर्षांपुर्वी दुसरा सावकार आरोपी भगवान रामा जायभाय रा. वंजारवाडी ता. जामखेड याच्या कडुन मयत कालिदास मिसाळ याने घर खर्चासाठी ३० हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जाच्या व्याजापोटी आरोपी भगवान जायभाय हा १ लाख २५ हजार रुपयांची मागणी करत होता. तसेच तिसरी महीला आरोपी शायरा नियामत सय्यद रा. पाटोदा हीच्या कडुन देखील ३० हजार रुपये घरखर्चासाठी कर्ज घेतले होते. व्याजापोटी व मुद्दल असे मिळून एकुण ४० हजार रुपयांची मागणी करत होते.

भोपाल में महिला ने की आत्महत्या, 'लव जिहाद' कानून के तहत दर्ज हुआ मामला | Woman commits suicide in bhopal case registered under love jihad(संग्रहित दृश्य.)

मला मारहाण शिवीगाळ व दमदाटी करतात……

फीर्यादीच्या भावाची परीस्थिती अतिशय हलाखीची आसल्याने तो लवकर पैसै देऊ शकत नव्हता तसेच वरील लोक मला मारहाण शिवीगाळ व दमदाटी करतात आसे देखील मयत कालिदास याने आपल्या भावास सांगितले होते. आखेर याच त्रासाला कंटाळून सोमवार  १४ ऑक्टोबर रोजी पहाटे कालिदास अभिमन्यू मिसाळ याने त्याच्या शेतातील लिंबाच्या झाडाला केबलच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. यानंतर मयताच्या खिशात एक डायरी आढळून आली व या डायरीत एका पानावर आलेश बाबुराव जगदाळे जामखेड व भगवान रामा जायभाय यांच्या त्रासाला कंटाळून मी आत्महत्या करीत आहे. आसा लिहलेला मजकुर आढळून आला आहे.विशेष म्हणजे फीर्यादी मयताचा भाऊ जगदीश मिसाळ हा मयत कालिदास याची बॉडी घेऊन जामखेड ग्रामीण रूग्णालयात आला त्यावेळी सकाळी ८:३७ वाजता आरोपी शायरा नियामत सय्यद रा. पाटोदा  हीचा मयत कालिदास याच्या मोबाईलवर फोन आला तो फीर्यादीने उचलला असता आरोपी महीला फोनवर म्हणाली की कालिदास मिसाळ कोठे आहे. त्याच्याकडे आसलेले माझे पैसै मला पाहिजेत त्याच्याकडे फोन द्या. यावेळी फीर्यादी याने सांगितले की माझ्या भावाने आत्महत्या केली आहे. आसे म्हणताच आरोपी महीलेने फोन कट केला.

अब्रुनुकसानी म्हणजे काय? कायदा त्याबद्दल काय सांगतो? - BBC News मराठी(संग्रहित दृश्य)

महाराष्ट्र सावकारी नियमन-अधिनियम नुसार गुन्हा दाखल…..

या प्रकरणी आरोपींनी मयत कालिदास मिसाळ यास गेल्या दोन वर्षांपासून घेतलेले कर्ज व व्याजाची रक्कम वसुल करण्यासाठी वेळोवेळी मारहाण करून शिवीगाळ व दमदाटी करुन आत्महत्येस प्रवृत्त केले आहेत. आशी फीर्याद जामखेड पोलीस स्टेशनला मयताच्या भावाने दिल्याने वरील तीनही आरोपींन विरोधात जामखेड पोलीस स्टेशनला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी व महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये पोलिसांनी भगवान रामा जायभाय रा. वंजारवाडी ता. जामखेड या आरोपीस अटक केली असून पुढील तपास जामखेड पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार सोनवलकर हे करीत आहे.

You Might Also Like

लग्नाला तगादा लावणाऱ्या प्रियकराने प्रेयसीला संपवले ; आधी पैसे कमवू, नंतर लग्न, प्रेयसीच्या उत्तरानं प्रियकर संतापला अन्…..

चक्क आरोपींकडूनच उकळली लाच ; एसीबीचीने मोठी कारवाई करत ३ पोलिसांना घेतलं ताब्यात. ! 

पत्नीने माहेरच्यांना बोलावून पतीला चोपलं ; अपहरण करून पतीला बेदम मारहाण करत हात-पाय मोडले.

त्या महिला डॉक्टरांचे AI च्या मदतीने बनवले अश्लिल व्हिडिओ ; गुन्हा दाखल.

खबरदार चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य कराल तर….. चाईल्ड पॉर्नोग्राफीचे कृत्य करणाऱ्या प्रोफाइल धारकांची माहिती भारत सरकारला, ३५७ जणांवर गुन्हा दाखल.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article पारनेर,अहिल्यानगर दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत ३ कोटी ६४ लाखांचा निधी मंजुर. – खासदार नीलेश लंके.
Next Article १५ हजार जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात पोलीस अधीक्षक राकेश ओला यांचा इशारा.
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?