एका तरुणाचा चाकूने सपासप वार करून खून,आईनेच दिली पोटच्या पोराला जीवे मारण्याची सुपारी कारण…..
TIMES OF AHMEDNAGAR | Maharashtra | Solapur | A mother gave betel nut to kill her own son | Murder by stabbing | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
कामधंदा न करता दारू पिऊन त्रास देत असल्याने स्वतःच्या मुलाला ठार मारण्याची सुपारी आईने दिल्याची धक्कादायक घटना टेंभुर्णी पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. याप्रकरणी मयताची आई, बहिणीसह अन्य तीन संशयितांना अटक करण्यात आल्याची माहिती टेंभुर्णी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक दीपक पाटील यांनी दिली आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
चाकूने वार करत हत्त्या….
मिळालेल्या माहितीनुसार २६ मे रोजी येथील सोलापूर पुणे महामार्गावर चव्हाणवाडी हद्दीत एका हॉटेलसमोर सायंकाळी ५ वाजता अज्ञात इसमाचा खून करून चार चाकी वाहनातून मृतदेह टाकून दिल्याची घटना घडली होती. मोंहमद अकबर खान याच्यासोबत मुनीरअली शब्बीरअली सय्यद ( वय ३७), महबूब वालीद अब्दुल ( वय ३५, रा. शेरलींगमपल्ली) यांनी सुकुमार यास नोकरी लावतो म्हणून त्याला कारमध्ये बसवून पुणे येथे गेले होते. पुन्हा तेथून माघारी सोलापूरकडे येत असताना सकाळी ११:४५ वाजेचा सुमारास टेंभुर्णी येथे आल्यावर त्याच्यावर चाकूने १५ वार करून चव्हाणवाडी (टेंभुर्ने) शिवारात फेकून दिले आणि सोलापूरच्या दिशेने निघून गेले. घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
ठार मारण्याची सुपारी….
ही कामगिरी पोलिस उपनिरीक्षक कलटीप सोनटक्के. विलास रणदिवे.संदीप गिरमकर, तुकाराम माने – देशमुख, विनोद साठे, प्रदीप पार्वते, पूनम शिंदे, पूनम देवकर, मनीषा मंठोळे, गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक सुबोध जमदाडे, कांबळे, सूरज निंबाळकर, फिंगरप्रिंट तज्ज्ञ जालीवर गळवे, सागर मठपती, गुटाळ, व्यंकटेश मोरे यांच्या पथकाने केली आहे. पोलिसांनी तत्काळ तपासाचे चक्र फिरवले अन् हाताच्या ठशावरून हा मृतदेह सुकुमार व्यंकटरामण्ण्णा गोडोचेरला (रा. सदाशिव पेठ मेडक, तेलंगणा) याचा असल्याचे निष्पन्न झाले आहे. घटनेच्या दिवशी इंदापूर व वरवडे येथील सीसीटीव्ही तपासले असता एका कारचा नंबर मिळाला आहे. त्याद्वारे मृताची आई अन्नपूर्णा व्यंकटरामण्णा तोराडी ऊर्फ गोडोचेरला (वय ६०), बहीण विनयाकरुणा राजेंद्र चौधरी (वय ४०, रा. शेरलिंगमपल्ली, तेलंगणा) यांनी मृत सुकुमार यास ठार मारण्याची सुपारी दिल्याचे सांगण्यात आले आहे.