TIMES OF AHMEDNAGAR.
त्या तरुणाचं टाळकं फोडून त्याला परत पाठवेन !
फक्त तीन मिनिटांत ब्राह्मण संपवू ! असा सोशल मिडियावर व्हिडिओ काढणाऱ्या तरुणाचा आणि त्याला अटक करताच त्याच्या सुटकेसाठी पोलिसांना आदेश देणाऱ्या एका आमदाराचा अभिनेत्री केतकी चितळे यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. केतकीच्या घरी एकदा एका तरुणाला कोणी तरी पाठवलं होते. त्या तरुणाला केतकीनं समजावून परत पाठवलं होत. पण आता जर कोणी माझ्या घराकडे आलं तर शांत बसणार नाही त्या तरुणाचं टाळकं फोडून त्याला परत पाठवेन असा दम केतकीनं दिला आहे.
स्त्रोत. सोशल मिडिया
आम्ही भगवान परशुरामांना मानणारे आहोत.
फेसबुकवर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओत केतकी चितळे म्हणते एखाद्यानं एका गालावर मारली तर दुसरा गाल पुढे करणारे आम्ही नाहीत. आम्ही भगवान परशुरामांना मानणारे आहोत आणि त्यांच्या हातात कोणतं शस्त्र असतं, हे सगळ्यांनाच माहीती आहे. तीन मिनिटांत ब्राह्मण संपवू, अशी भाषा बोलणाऱ्या त्या युवकाला अटक झाली आणि पावसात भिजणाऱ्या आजोबाच्या आमदार असलेल्या नातवानं पोलिसांवर दबाव आणून त्या युवकाच्या सुटकेसाठी प्रयत्न केले.आम्ही काही बोललो, की अनेकांच्या भावना दुखावल्या जातात. पण उघड उघड ब्राह्मण द्रोह करणाऱ्यांबद्दल आम्ही काहीच बोलायचं नाही का ? केतकी चितळेच्या या दमबाजीचा परिणाम ब्राह्मण द्वेषाची भावना असणाऱ्या लोकांवर कितपत होईल, हा प्रश्नच आहे.