मतदान प्रक्रियेच्या प्रशिक्षणास दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा दंडुका. हे आहेत ते कर्मचारी.
TIMES OF AHMEDNAGAR | INDIA | GOVERNMENT OF INDIA | ELECTORAL OFFICER | MAHARASHTRA | LOK SABHA ELECTION | AHMEDNAGAR DISTRICT | ELECTION OFFICER SIDDHARAM SALIMATH | NON-ATTENDANCE OF EMPLOYEES IN THE TRAINING PROGRAM ON VOTING PROCESS IN LOK SABHA CONSTITUENCIES | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी १३ मे रोजी मतदान होत आहे. त्यासाठी ३७३४ मतदान केंद्र आहेत. या मतदान केंद्रावर मतदानाच्या दिवशी कोणते कामकाज करायचे तसेच मतदान यंत्र हाताळणी संदर्भात प्रशिक्षण वर्ग प्रत्येक विधानसभा मतदारसंघात रविवार ७ एप्रिलला रोजी आयोजित करण्यात आले होते.
स्त्रोत.सोशल मिडिया.
कामचुकारांवर कारवाईची दंडुका.
नगर व शिर्डी लोकसभा मतदारसंघातील मतदान प्रक्रियेच्या पहिल्या प्रशिक्षण वर्गास अनेक कामचोर कर्मचाऱ्यांनी दांडी मारली होती. दांडी मारणाऱ्या कर्मचाऱ्यांवर निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी यांनी कारवाईचा दंडुका उचलला आहे. गैरहजर राहिलेल्या एकूण १ हजार २० कर्मचाऱ्यांना कारवाईच्या नोटिसा धाडण्यात आल्या आहेत. या गैरहजर कर्मचाऱ्यांसाठी पुन्हा सोमवार दि. १५ एप्रिलला प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. याही प्रशिक्षण वर्गास गैरहजर राहिल्यास एकतर्फी कारवाईचा इशारा देणाऱ्या नोटिसा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी बजावल्या आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया.
गैरहजर कर्मचारी किती. ?
मतदान प्रक्रियेसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर चार तसेच राखीव असे एकूण १६,६८० कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या सर्वांसाठी प्रशिक्षण वर्ग सहायक निवडणूक अधिकारी व मास्टर ट्रेनर यांनी आयोजित केले होते. मात्र या प्रशिक्षण वर्गास दोन्ही मतदारसंघात मिळून एकूण १०२० कर्मचारी गैरहजर राहिले.
विधानसभा मतदारसंघनिहाय गैरहजर कर्मचारी.
नगर मतदारसंघात शेवगाव १२०, श्रीगोंदा ७२, कर्जत- जामखेड १३०, नगर ७२, पारनेर ४९, राहुरी ६८ एकूण ५११ तर शिर्डी मतदारसंघात अकोले ८०, कोपरगाव १३१, नेवासा ८६, श्रीरामपूर ४८, संगमनेर ९९, शिर्डी ६०, एकूण ५०९. दोन्ही मतदारसंघ मिळून एकूण १०२० कर्मचारी गैरहजर होते.