By using this site, you agree to the Privacy Policy and Terms of Use.
Accept
Times Of AhmednagarTimes Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Reading: दहशतवाद्यांशी लढताना अहिल्यानगरच्या शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी भूमिपुत्राला वीरमरण.
Share
Aa
Aa
Times Of AhmednagarTimes Of Ahmednagar
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
  • अहमदनगर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • राजकारण
  • क्रिडा
  • मनोरंजन
Follow US
  • Advertise
या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Times Of Ahmednagar > news > अहमदनगर > दहशतवाद्यांशी लढताना अहिल्यानगरच्या शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी भूमिपुत्राला वीरमरण.
अहमदनगर

दहशतवाद्यांशी लढताना अहिल्यानगरच्या शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी भूमिपुत्राला वीरमरण.

Last updated: 2025/05/23 at 12:24 PM
By BHAIYYASAHEB BOXER 3 Min Read
Share
SHARE

TIMES OF NAGAR

अहिल्यानगर : अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावाचे शूर भूमिपुत्र संदीप पांडुरंग गायकर हे दहशतवाद्यांशी लढताना देशासाठी शहीद झाले आहेत. भारतीय सैन्याच्या युनिट – १५ मराठा लाईट इन्फंट्री सध्या १७ राष्ट्रीय रायफल जम्मू काश्मीरमध्ये ते सेवा बजावत होते. सर्च ऑपरेशन दरम्यान दहशतवाद्यांशी लढताना संदीप गायकर हे शहिद झाले आहेत. संदीप गायकर हे अत्यंत शिस्तबद्ध, कर्तव्यनिष्ठ आणि राष्ट्रप्रेमी सैनिक होते.अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा गावाचे शूर भूमिपुत्र संदीप गायकर यांनी आपले कर्तव्य बजावत असताना प्राणाची आहुती दिली आहे. त्यांच्या बलिदानाने संपूर्ण ब्राम्हणवाडा गाव, अकोले तालुका आणि अहिल्यानगर जिल्हा शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या शौर्याची आणि बलिदानाची आठवण संपूर्ण ब्राम्हणवाडा गाव तसेच अकोले तालुका आणि संपूर्ण देशाला सदैव अभिमानाने राहील.

New move of terrorists; Guerrilla warfare training, weapons also changed,  local recruitment started to be avoided, secret information claims, foreign  terrorists also hiding in Jammu and Kashmir | दहशतवाद्यांची नवी चाल; गनिमी(संग्रहित दृश्य. )

दहशतवादी जंगलात, गुहेत किंवा डोंगराळ भागात लपले…..

जम्मू आणि काश्मीरच्या इतिहासातील निष्पाप पर्यटकांवरील सर्वात क्रूर दहशतवादी हल्ला २२ एप्रिल रोजी पहलगाममधील बैसरन व्हॅलीमध्ये झाला. २२ एप्रिल २०२५ रोजी, चार दहशतवादी जंगलातून पहलगामच्या बैसरन खोऱ्यात आले. पर्यटकांचा धर्म विचारत त्यांनी १५ मिनिटे अंदाधुंद गोळीबार केला होता. त्यांनी एकूण २६ जणांना ठार मारले आणि पुन्हा जंगलात गायब झाले. या घटनेत महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश होता. या घटनेला आता एक महिना झाला असून , सुरक्षा दल सतत कारवाई करत आहेत, परंतु त्या चार क्रूर दहशतवाद्यांना अद्याप पकडता आले नाही. पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूर मोहीम पार पडली, अजून राष्ट्रीय तपास यंत्रणेला त्या दहशतवाद्यांची माहिती मिळालेली नाही. हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी, २३ एप्रिल रोजी, राष्ट्रीय तपास संस्थेची म्हणजेच एनआयएची टीम घटनास्थळी पोहोचली. गृह मंत्रालयाच्या आदेशानंतर, एनआयएने २७ एप्रिलपासून अधिकृतपणे या प्रकरणाचा तपास हाती घेतला. एनआयए प्रमुख सदानंद दाते या प्रकरणावर सतत लक्ष ठेवून आहेत. एजन्सीचे आयजी, डीआयजी आणि एसपी दर्जाचे तीन अधिकारी तपासासाठी  तैनात आहेत. एनआयएची एक टीम अजूनही पहलगाम आणि आसपासच्या भागात सतत तपास करत आहे. आतापर्यंत ३ हजारांहून अधिक लोकांची चौकशी करण्यात आली असून यापैकी अनेक लोकांना दररोज पहलगाम पोलिस ठाण्यात हजर राहण्यास बोलावले जात आहे.दरम्यान, आतापर्यतच्या चौकशीनुसार फरार चार दहशतवादी फक्त दोन किंवा तीन स्थानिकांच्या संपर्कात असून तेच त्यांना आवश्यक वस्तू पोहोचवत आहेत. यामुळे दहशतवाद्यांना शोधणे कठीण होत आहे. दहशतवादी जंगलात, गुहेत किंवा डोंगराळ भागात बांधलेल्या लपण्याच्या ठिकाणी लपून बसले असण्याची शक्यता आहे.

You Might Also Like

रक्षकच निघाले भक्षक ; अन् गरिबांना फसवणारा निघाला पोलीस उपअधीक्षकांचा अंगरक्षक ?

पालिका निवडणुकांना पुढे ढकलणार ? प्रभाग रचना कार्यक्रमातून सगळंच स्पष्ट होणार…..

महापालिका निवडणुका जाहीर ; कसा असेल कार्यक्रम.?

पोलीस उपअधीक्षकांवर गोळीबार करणारा आरोपी जिल्हा रुग्णालयातून पसार ; पोलिसांच्या हातावर तुरी देत असा झाला पसार…..

राहुरीच्या तनपुरे साखर कारखाना निवडणुकीत जनसेवा मंडळाचा दणदणीत विजय.

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Print
What do you think?
Love0
Sad0
Happy0
Sleepy0
Angry0
Dead0
Wink0
By BHAIYYASAHEB BOXER
Follow:
EDITOR IN CHIEF TIMES OF NAGAR. GROUP, PRINT MEDIA, ELECTRONIC MEDIA, WEB MEDIA, DIGITAL MEDIA, SOCIAL MEDIA.
Previous Article पत्नीकडून होणाऱ्या मानसिक छळामुळं पोलिसाच्या मुलानं ‘पप्पा त्यांना सोडू नका… ‘ म्हणत संपवलं आयुष्य……
Next Article अभिनेता सलमान खानच्या सुरक्षेचा प्रश्न चव्हाट्यावर ? ती सलमान खानच्या घरात घुसली दार वाजवले अन् ……….
Leave a comment

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

या साइटवर उपलब्ध मजकूर अथवा बातम्या ह्या सूत्रांच्या आधारे प्रसारित केल्या जातात. timesofahmednagar कोणत्याही बातमीची अथवा मजकुराची हमी देत नाही.बातम्यांच्या संदर्भात काही आढळल्यास संबंधित विषयाच्या तज्ञांकडून मार्गदर्शन / सल्ला घ्यावा. प्रसिद्ध केलेल्या बातमी अथवा इतर विषयांमुळे कोणत्याही सजीव / निर्जीव नुकसान झाल्यास किंवा भावना दुखावल्यास त्याला योगायोग समजावा. आम्ही बातमी सूत्रांच्या आधारे प्रसारित करत आहोत या करिता कोणत्याही बातमीला संपादक अथवा कार्यालयाचा कोणताही व्यक्ती अथवा इतर जबाबदार राहणार नाही याची नोंद घ्यावी. व खात्री करूनच बातमी वाचावी.
Login
Use Phone Number
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?