अभिनेता अक्षय कुमार भाजपचा उमेदवार , भाजपकडून निवडणुकीच्या रिंगणात ?
TIMES OF AHMEDNAGAR | DELHI | BJP | BJP NATIONAL PRESIDENT J.P. NADDA | NARENDRA MODI | AMIT SHAH | ACTOR AKSHAY KUMAR | AKSHAY KUMAR WILL CONTEST ELECTION FROM BJP PARTY? | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अभिनेता अक्षय कुमार हा चित्रपटांपेक्षा त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे जास्त चर्चेत असतो. कधी त्याच्या नागरिकत्वासाठी तर कधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतल्यामुळे त्याला ट्रोल केले जाते. अक्षय कुमार राजकारणात येणार असल्याच्या बातम्या अनेकदा समोर आल्या होत्या. परत एकदा अशाच बातम्या समोर येत आहेत. अभिनेता अक्षय कुमार भारतीय जनता पार्टीच्या म्हणजेच भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवू शकतो असा अंदाज लावण्यात येत आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया
भाजप नेते आणि अक्षय कुमार यांच्यात चर्चा….
लोकसभेच्या निवडणुका एप्रिल आणि मे महिन्यात होणार आहेत. त्यापूर्वीच राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या जागांसाठी वेगवेगळ्या दावेदारांची नावे समोर येत आहेत. अभिनेता अक्षय कुमारला भाजपने तिकीट दिल्याचा दावा मीडिया रिपोर्ट्समध्ये केला जात आहे. तो दिल्लीतील चांदनी चौकच्या मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतो असंही सांगण्यात येत आहे. भाजप नेते आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्यात निवडणूक लढवण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही सांगितले जात आहे.अद्याप या गोष्टींची पुष्टी ना अभिनेता अक्षय कुमारने केली आहे आणि ना भारतीय जनता पक्षाने यावर अधिकृतरित्या भाष्य केलं आहे. परंतु अभिनेता अक्षय कुमारचे भाजपाबरोबर चांगले संबंध आहेत यामुळेच अभिनेता अक्षय कुमारला यावेळी तिकीट मिळू शकते असंही सांगितलं जात आहे. अक्षयच्या ‘सम्राट पृथ्वीराज’ या चित्रपटाचे प्रमोशन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केले होते.
स्त्रोत.सोशल मिडिया
कंगना रानौत देखील भाजपकडून निवडणूक लढवणार?
सोशल मीडियावर मात्र सध्या या गोष्टीवर चांगलीच चर्चा होताना दिसत आहे. या आधीही अभिनेता अक्षय कुमारने तो राजकारणात येणार नसल्याचं स्पष्ट केलं होते. तर त्याच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर कॉमेंट करत अभिनेत्यांनी राजकारणात न पडलेलंच बरं असं म्हणत अक्षयची बाजू घेतली आहे. अक्षयच्या बरोबरीनेच कंगना रणौत देखील यावेळी भाजपाकडून निवडणूक लढणार असल्याची चर्चा होत आहे. आधीच्या बऱ्याच मुलाखतींमध्ये कंगनाने तिच्या राजकीय विचारांबद्दल उघडपणे भाष्य केलं आहे. तरीही कंगनाने सुद्धा या गष्टींची पुष्टी केलेली नाही.