प्राणघातक हल्ल्यावर चावलांची प्रतिक्रिया व्हिडिओ व्हायरल .
अहमदनगर – अहमदनगर शहरातील विधीतज्ञ अॅड. हर्षद चावला यांच्यावर काही हल्लेखोरांनी जीवघेणा हल्ला केला आहे.दैनंदिन कामकाज आवरून अॅड. हर्षद चावला हे काही कामानिमित्त केडगाव येथे गेले होते. केडगाव येथील अर्चना स्वीट्स येथून त्यांनी मिठाई खरेदी केली. मिठाई घेऊन घरी परतत असतांना काही हल्लेखोरांनी चावला यांच्यावर प्राणघातक हल्ला केला आहे. यामध्ये चावला गंभीर जखमी झाले आहेत.अधिक उपचारासाठी चावालायांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.प्रकृती चिंताजनक असल्याने चावालांना मॅककेअर हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले आहे.
काँग्रेसच्या किरण काळेंवर चावलांचा गंभीर आरोप.
अॅड. हर्षद चावला यांच्यावर केडगाव येथे झालेल्या हल्याचा आरोप चावला यांनी कॉंग्रेसच्या किरण काळे यांच्यावर लावला आहे. हॉटेल वैष्णवराज येथे अवैधधंदे सुरु असल्याची माहिती पोलिसांना दिल्याचा राग मनात धरून प्रशांत पवार,असद गफ्फार शेख,कुमार कचरे यांनी केडगाव येथे अडवून शिवीगाळ केली. पोलिसांना फोन करून आमच्या धंद्यांची माहिती देतो,आमचे धंदे बंद करतो,आमच्या बॉस ला त्रास देतो. मला मारत असतांना हल्लेखोरांनी संजय झिंजे आणि किरण काळे यांचे नाव घेत आमच्या बॉसला त्रास देतो याला संपून टाका याचा काटा काढून टाका.याला सोडूच नका याला जीवेच मारून टाका.किरण काळे व संजय झिंजे त्यांचे नाव घेऊन मला मारत होते असे गंभीर आरोप चावला यांनी किरण काळे व संजय झिंजे यांच्यावर लावला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्याकडे न्याय मिळण्याची मागणी अॅड. हर्षद चावला यांनी केली आहे.
चावालांनी दिलेली प्रतिक्रिया व्हिडीओ.