अहमदनगर – अहमदनगर शहरात अत्याचारांना उत आला आहे. काही दिवसांपूर्वी सावेडी येथील एका खासगी क्लासेसमध्ये एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकाने अत्याचार केला होता. दोन दिवसांपूर्वी राधाबाई काळे महिला विद्यालयात देखील अशीच घटना घडली होती.परीक्षेत पास करतो म्हणून एका शिक्षकाने विद्यालयातील अल्पवयीन विद्यार्थिनीला शाररिक सुखाची मागणी केली होती.
शिक्षकांचे प्रकरण थांबत नाही तोच एका डॉक्टराचा नागडा नाद समोर आला आहे. उपचारासाठी त्या डॉक्टराच्या क्लिनिकमध्ये आलेल्या अल्पवयीन मुलीवर ( वय १७) डॉक्टरनेच वारंवार अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नगर तालुक्यातील एका गावात घडली आहे. याप्रकरणी पीडित अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरून डॉ.अंगद खाडे ( रा. विळद तालुका नगर) विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे.
संबंधित डॉक्टरांवर गुन्हा दाखल होताच त्याला पोलिसांनी अटक केली सोमवारी त्याला न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने १४ फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. डॉ. खाडे रविवारी दुपारी क्लिनिक मध्ये असताना अल्पवयीन मुलीवर उपचार करण्याचा बहाना करून त्याने इच्छेविरुद्ध वारंवार अत्याचार केला हा प्रकार कोणाला सांगितला तर जिवे ठार मारण्याची धमकी दिली होती.

