त्याने कापड व्यावसायिकाला ती लिंक पाठवली अन व्यावसायिकाची तब्बल १५ लाखांची केली लुट.
TIMES OF AHMEDNAGAR | AHMEDNAGAR | CRIME NEWS | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE | CYBER CELL, AHMEDNAGAR | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर : बिटकॉइन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त नफा मिळवून देईल असेआमिष दाखवून नेवासा येथील कापड व्यावसायिकाची १५ लाख दोन हजार ८०० रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. मुकेश भगवानलाल शिंगी (वय ३२ रा. बँक ऑफ महाराष्ट्र शेजारी, कडू गल्ली, नेवासा) असे फसवणूक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे.
(संग्रहित दृश्य.)
बिटकॉइन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त नफा…..
याप्रकरणी शिंगी यांनी मंगळवारी (२४ सप्टेंबर) सायंकाळी अहमदनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून एका टेलिग्राम आयडी धारक व्यक्तीविरोधात फसवणूक, आयटी अॅक्ट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांना २९ मे २०२४ रोजी त्यांच्या टेलिग्राम आयडीवर एका अनोळखी टेलिग्राम आयडीवरून मेसेज आला होता. यामध्ये बिटकॉइन ट्रेडिंगमध्ये गुंतवणूक केल्यास जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याचे सांगितले होते. तसेच एक लिंक पाठवली होती व त्या लिंकव्दारे ट्रेडिंग खाते उघडण्यास व दिलेल्या यूपीआय आयडी, बँक खात्यावर ट्रेडिंगमध्ये गुंतवणूकीसाठी पैसे पाठविण्यास सांगितले असल्याचे फिर्यादीने म्हंटले आहे. फिर्यादीने त्या व्यक्तीवर विश्वास ठेऊन सांगितल्या प्रमाणे लिंक ओपन करून ट्रेडिंग खाते उघडले. त्या व्यक्तीने पाठविलेल्या यूपीआय आयडी व बँक खात्यावर २९ व ३० मे २०२४ रोजी एकुण १५ लाख दोन हजार ८०० रूपये पाठविले होते.
(संग्रहित दृश्य.)
त्याने शिंगी यांना पैसे दिले नाहीत.
फिर्यादी शिंगी यांनी संबंधीत व्यक्तीला टेलिग्रामवर मेसेज करून ट्रेडिंगमध्ये झालेला नफा व गुंतवणुकीची रक्कम काढून घेण्यासाठी विचारणा केली असता संबंधीत व्यक्तीने शिंगी यांना सांगितले की, नफा व गुंतवणुक केलेली रक्कम काढून घेण्यासाठी अजून टास्क पूर्ण करावे लागेल. फिर्यादी यांनी त्या व्यक्तीकडे वारंवार संपर्क करून भरलेली रक्कम व ट्रेडिंगमधील टास्क पूर्ण करून झालेला नफा मागितला. परंतू त्याने शिंगी यांना पैसे दिले नाहीत. आपली फसवणूक झाली असल्याचे शिंगी यांच्या लक्ष्यात आल्यानंतर त्यांनी ऑनलाईन तक्रार नोंदवली. दरम्यान सायबर पोलिसांनी तक्रारीची चौकशी करून मंगळवारी सायंकाळी गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक मोरेश्वर पेंदाम करत आहेत.