लखनऊ : बहुजन समाजवादी पक्षाच्या प्रमुख आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांच्या भाचीने पतीसह सासरच्या सात जणांवर ती हुंड्यासाठी छळ केल्याचा गंभीर आरोप केला आहे. कोर्टाच्या आदेशानंतर हापुड कोतवालीतील मायावतींची भाची एलिस हिचा पती, सासू, सासरे, मोठे दीर, जाऊ, नणंद आणि आत्तेसासरे यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आलेली आहे. एलिसच्या सासूबाई असलेली आरोपी महिला हापुड नगरपालिकेची अध्यक्ष आहेत. त्यांनी मायवतींच्या बसपच्या तिकिटावर निवडणूकही लढवली होती. एलिसने सासरचे लोक तिला धमक्या देत आहेत. हुंड्यासाठी मागणी करत आहेत असं सांगितलं आहे. उत्तर प्रदेशातील हापुडमध्ये बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) प्रमुख मायावती यांच्या भाचीने तिच्या सासरच्या ७ जणांविरुद्ध हुंड्यासाठी छळ घरगुती हिंसाचार आणि लैंगिक शोषणाचा आरोप करत गुन्हा दाखल केला आहे. लग्नापासूनच सासरच्या मंडळींनी हुंडा म्हणून पक्षाचे तिकीट ५० लाख रुपये रोख आणि गाझियाबादमध्ये फ्लॅटची मागणी केल्याचा आरोप आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे. हे प्रकरण हापुड नगर कोतवाली भागातील आहे. बसपा प्रमुख मायावती यांच्या भाचीचा विवाह (दि.९) नोव्हेंबर २०२३ रोजी हापूर नगरपरिषदेच्या अध्यक्षा पुष्पा देवी यांचा मुलगा विशाल सिंग यांच्याशी झाला. लग्नानंतर सासरच्यांनी त्यांच्या राजकीय प्रभावाचा वापर करून बहुजन समाज पक्षाचे तिकीट, ५० लाख रुपये रोख आणि गाझियाबादमध्ये फ्लॅटची मागणी करण्यास सुरुवात केल्याचा आरोप आहे. पीडितेच्या वतीने तिचे वकील राजीव शर्मा म्हणाले की आरोपीने तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला आहे. पीडितेने आरोप केला आहे की तिचा पती बॉडी बिल्डिंगसाठी स्टिरॉइड्स वापरतो एलिसने आणखी एक धक्कादायक खुलासा केला आहे. तिचा पती विशाल लग्नाआधीपासूनच स्टेरॉइडचे इंजेक्शन घेऊन मसल्स बनवत होता त्यामुळे तो नपुंसक झाला आहे. हे सत्य सासरच्या लोकांना आधीपासूनच माहीत होते. तरीही त्यांनी तिचं लग्न त्याच्याशी करून दिलं. जेव्हा तिने यावर प्रश्न विचारला तेव्हा तिच्या सासरच्यांनी तिला गप्प राहण्यास सांगितले. एलिसने याबद्दल तिची सासू आणि नणंद यांच्याशी चर्चा केली तेव्हा त्या एलिसला म्हणाल्या जर मूल पाहिजे असेल तर मोठ्या दिराकडून करून घे.
(संग्रहित दृश्य.)
सासऱ्याने आणि दीराने एलीसवर लैंगिक अत्याचार…
पीडितेच्या म्हणण्यानुसार तिच्या सासू आणि नणंदने तिला तिचा दिर भूपेंद्र उर्फ मोनू याच्याकडून मूल करून घेण्यास सांगितले. या अमानुष आणि अपमानास्पद वागणूकीनंतर( दि.१७) फेब्रुवारी २०२५ च्या रात्री एलिससोबत एक भयानक घटना घडली. एफआयआरमध्ये नोंदवलेल्या जबाबानुसार दि. १७ फेब्रुवारीच्या रात्री तिच्या सासऱ्याने आणि दीराने एलीसवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. जर त्याची हुंडा मागणी पूर्ण झाली नाही तर त्याने तिची बदनामी करण्याची धमकीही तिला दिली. या घटनेनंतर एलिस तिच्या पालकांच्या घरी पोहोचली आणि पोलिसांकडे या प्रकरणाची तक्रार केली. सासरच्यांच्या राजकीय प्रभावामुळे कोणतीही कारवाई झाली नाही असा तिचा आरोप आहे. ( दि.२१ ) मार्च रोजीही हापुड एसपींना नोंदणीकृत पोस्टाने तक्रार पाठवण्यात आली होती परंतु तरीही कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. अखेर ( दि.२४) मार्च रोजी पीडितेने न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाच्या आदेशानंतर, (दि.१०) एप्रिल रोजी हापूर नगर कोतवाली येथे एफआयआर दाखल करण्यात आला. एसएचओ मुनीश प्रताप सिंह यांनी सांगितले की बीएनएस (भारतीय न्याय संहिता) आणि हुंडा प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ( दि.८) एप्रिलला कोर्टाने आरोपींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानंतर हापुड कोतवालीमध्ये एलिसचा पती विशाल सिंह सासरे श्रीपाल सिंह, सासू पुष्पा देवी, जेठ भूपेंद्र उर्फ मोनू, जेठाणी निशा आणि नणंद शिवानी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. एलिसने सांगितले की सासरचे लोक तिला धमक्या देत आहेत. तुझी आत्या बसपच्या सर्वेसर्वा आहेत त्यांच्याकडे खूप पैसा आहे. त्यामुळे फ्लॅट आणि ५० लाख रुपये घेऊन ये असं ते म्हणत होते. तिने नकार दिल्यावर तिला शिवीगाळ केली मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. जर तिने कोणाला काही सांगितले तर त्याचे परिणाम वाईट होतील, असंही तिला धमकावण्यात आलं होतं. मायावती यांच्या कुटुंबामध्ये एकूण नऊ भाऊ-बहीण आहेत. एलिस ही नरेश कुमार यांची मुलगी आहे. तिचं लग्न दि.९ नोव्हेंबर २०२३ रोजी नवी दिल्लीतील एका हॉटेलमध्ये हिंदू रितीनुसार विशाल सिंहसोबत झालं होतं. लग्नानंतर काही दिवस चांगले गेले पण नंतर पती आणि सासरच्या लोकांनी तिच्यावर हुंड्यासाठी दबाव आणायला सुरुवात केली तिला मारहाण आणि धमक्या दिल्या असा आरोप आहे.