किशोरची अवैध धंद्यांवर आर्थिक तोफ , अधिकाऱ्यांना लागली लक्षी झोप. ?
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | AHMEDNAGAR DISTRICT | AHMEDNAGAR POLICE | MIDC POLICE STATION, AHMEDNAGAR | DISTRICT SUPERINTENDENT OF POLICE RAKESH OLA | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर जिल्ह्यासह शहर देखील अवैध धंद्यांचा अड्डा झाला आहे. प्रशासनाकडून अत्यंत तगडे नियोजन करून कारवाई केली जाते. फौजफाटा घेऊन प्रशासन एकदम ताकदीने जाऊन अवैध धंद्यांवर कारवाई करून प्रसारमाध्यमातून स्वतःवर कौतुकाचा वर्षाव करून घेत असल्याचे बोलले जाते. मात्र काही तासातच हे धंदे पुन्हा जैसे थे च्या अवस्थेत दिसतात. हि एकंदरीत परीस्थिती पाहता प्रशासनाची कारवाई हि छातुर मातुर कारवाई असल्याचे मत खासगीत व्यक्त करून स्थानिक रहिवासी नाराजी व्यक्त करतात.
एमआयडीसी पोलीस ठाण्याचे नूतन पोलीस निरीक्षक यांच्याकडून नागरिकांची मोठी अपेक्षा होती. पोलीस निरीक्षक पदाचा कारभार स्वीकारताच या अधिकाऱ्यांनी अवैध धंद्यांवर कारवाई करून नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला,मात्र या सर्व कारवाया छातूर-मातुर कारवाया होत्या अस नागरिक सांगतात. पोलीस निरीक्षकांना कोणाचे दडपण आहे का हा प्रश्न देखील प्रामुख्याने उपस्थित होत आहे. तर किशोरच्या सांगण्यावर काही अधिकारी काम करत असल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त होत आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
एमआयडीसीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट.
एमआयडीसीत अनेक उद्योग धंदे आहेत. अनेक परप्रांतीय रोजगाराच्या शोधात शहरातील एमआयडीसी येथील कंपन्यांमध्ये येतात. मात्र या परप्रांतीयांची मोठ्या प्रमाणात लुट होत असल्याने अनेक परप्रांतीय हे शहर सोडून जात आहेत. तर एमआयडीसीत काही ठिकाणी वेश्याव्यवसाय हा मोठ्या प्रमाणात सुरु आहे. काही परप्रांतीयांना वेश्याव्यवसाय करणारे ब्लॅकमेलिंग करून त्यांचाकडून पैसे उकळत आहेत.
स्त्रोत.सोशल मिडिया
किशोरचा आशिर्वाद अन अवैध धंद्यांचा धिंगाणा.
एमआयडीसी भागात अवैध दारू विक्री, अवैध गुटखा विक्री, अवैध जुगार सारखे अनेक अवैध धंदे एमआयडीसी परिसरात सुरु आहेत. या अवैध धंदे चालकांना किशोर नामक एक व्यक्ती मदत करत असल्याची प्राथमिक माहिती आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचे भासवून बिनधास्त धंदे करा मी आहे अशी भूमिका किशोरची असल्याचे समजते. किशोर हा वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या नावावर या अवैध धंदे चालकांकडून पाकीट घेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. मात्र कशाचे पाकीट आणि हा किशोर कोण हे अद्यापही स्पष्ट झालेले नाही. किशोरला कोणत्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आश्रय आहे,किशोर कोणत्या खात्याच्या अधिकाऱ्यांच्या नावावर दहशत माजवतो हे शोधणे गरजेचे असल्याची सध्या चर्चा जोरदार रंगली आहे.