लोरी चित्रपटासाठी अल्ताफ दादासाहेब शेख यांचे संगीत ; गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये शेख यांच्या गाण्याची नोंद होती.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | BOLLYWOOD | LORI CINEMA | DIRECTOR ALTAF SHAIKH | ALTAF SHAIKH COMPOSED THE MUSIC FOR THE MOVIE LORI | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO
आजवर अनेक मराठी चित्रपटांसाठी लेखन,दिग्दर्शन आणि गीत लेखन करणारे अल्ताफ शेख आता ‘लोरी’ या हिंदी चित्रपटाच्या माध्यमातून संगीत दिग्दर्शकाच्या रूपाने प्रेक्षकांच्या समोर येत आहेत. या चित्रपटाचे गीतकार अल्ताफ शेख आहेत , या चित्रपटासाठी संगीत देखील अल्ताफ शेख यांनीच दिले आहे. संगीत दिग्दर्शनात त्यांना सुधीर कुमार हजेरी यांची मोलाची साथ लाभली आहे. सुरेश वाडकर, उर्मिला धनगर, स्वप्निल बांदोडकर, प्रियांका बर्वे आणि अंजली गायकवाड यासारख्या दिग्गज गायक, गायिकांनी स्वरबद्ध केले आहे.
अल्ताफ शेख यांच्या गाण्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद.
अल्ताफ शेख यांच्या २०१८ साली बॉक्स ऑफीसवर भरघोस कमाई केलेल्या ‘वेडा बी.एफ.’ या मराठी सिनेमातील ‘दुर्वेश बाबा’ हे सुप्रसिद्ध गायक अल्ताफ राजा यांनी गायलेलं गाणं अतिशय लोकप्रिय झालं होतं आणि त्यामुळेच या गाण्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद करण्यात आली होती. या गाण्याची लोकप्रियता पाहुनच ‘लोरी’ चित्रपटाचे निर्माते अविनाश कवठणकर व दिग्दर्शक राजू रेवणकर यांनी अल्ताफ शेख यांना संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी दिली. त्यांच्या विश्वासाला पात्र होत, शेख यांनी हे शिवधनुष्य लिलया पेलले आहे.
गाणे रेकॉर्ड करताना स्व.मोहम्मत रफीच्या गायन शैलीची आठवण झाली.
साई राम अ क्रिएटिव्ह वर्ल्डची प्रस्तुती असलेल्या ‘लोरी’ या चित्रपटात एकूण चार गाणी आहेत. चारही गाणी वेगवेगळ्या धाटणीची आहेत. अर्थात शीर्षक लोरी असल्याने यात एक लोरी गीत आहे, प्रेम गीत आहे, आईची ममता दर्शवणारे एक भावनिक गीत आहे आणि एक जल्लोष गीत आहे. असे चार वेगवेगळ्या प्रकारचे गाणी करताना स्थळ, काळ, वेळ, भूमिका या सगळ्यांचाच विचार करावा लागला असल्याचे मत अल्ताफ शेख यांनी व्यक्त केले, ते पुढे सांगतात की या सिनेमातील गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळी सुरेश वाडकर यांना गाणे रेकॉर्ड करताना स्व.मोहम्मत रफीच्या गायन शैलीची आठवण झाली होती. हिंदी आणि मराठी कलाकारांचा मेळ घातलेल्या या सिनेमाची गोष्ट ही आई आणि मुलीच्या प्रेमाची, संघर्षाची आहे. महिला प्रेक्षक वर्गासह पुरुष प्रेक्षकांना देखील हा सिनेमा आकर्षित करेल यात शंका नाही.