अमान शेख या २३ वर्षीय तरुणाची हत्या. या मुळे अमानला संपवले …….
TIMES OF AHMEDNAGAR | AMAN SHAIKH | 23-YEAR-OLD YOUTH KILLED | THE POLICE ARRESTED THE ACCUSED | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO|
अमान शेख यांच्या हत्येबद्दल पोलिसांनी आरोपींकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना गुन्ह्याची माहिती दिली आहे. आरोपींनी तरुणाला घरी बोलावले आणि त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याच्यावर चाकूने वार करून त्याची हत्या करण्यात आली. तसेच पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी तरुणाचा मृतदेह मिठी नदीत फेकून दिला असे पोलिसांनी सांगितले. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने दोन साथीदारांच्या मदतीने २३ वर्षीय तरुणाची हत्या करून त्याचा मृतदेह कुर्ल्यातील मिठी नदीमध्ये फेकला होता.
स्त्रोत.सोशल मिडिया.
पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून एका व्यक्तीने दोन साथीदारांच्या मदतीने २३ वर्षीय तरुणाची हत्या करून त्या तरुणाचा मृतदेह कुर्ल्यातील मिठी नदीमध्ये फेकला होता. याबाबत गुन्हे शाखेने तपास करून तीन आरोपींना अटक केली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत. कुर्ला पोलिसांना ५ जानेवारी रोजी कुर्ल्या येथील एमटीएनएल जंक्शन परिसरातील मिठी नदीच्या पात्रात एका २३ वर्षीय तरुणाचा मृतदेह सापडला होता. याचदरम्यान गुन्हे शाखा परिमंडळ ४ ने देखील या गुन्ह्याचा समांतर तपास करून मृतदेहाची ओळख पटवली. अमान शेख असे या मृत तरुणाचे नाव असून तो गोवंडी परिसरात वास्तव्यास होता. पोलिसांनी परिसरात अधिक चौकशी केली असता काही दिवसांपूर्वी तिघांपैकी एका आरोपीसोबत अमानचा वाद झाल्याचे समजले. याबाबत कुर्ला पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. ही माहिती मिळताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी गोवंडी परिसरातून तिघांना ताब्यात घेतले.