कल्याणरोड वर झालेल्या अपघातात चिमुकलीचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी.यात्रेसाठी निघालेल्या पिकअपचा अपघात.
AHMEDNAGAR | KALYAN ROAD ACCIDENT | AHMEDNAGAR ACCIDENT | DEATH OF LITTILE GIRL | THREE PEOPLE WERE SERIOUSLY INJURED | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर – कल्याण रोडवर कर्जुले हद्दीत पहाटे पाच वाजता पिकअपचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये एका चिमुकलीचा जागीच मृत्यू झाला आहे. या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार अहमदनगर- कल्याण रोडवर (शनिवार दि.१३ एप्रिल) पहाटे साडे पाच वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये पाच वर्षांच्या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना उपचारासाठी जवळच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना मदत केली आहे. अपघातस्थळी प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पिकअपमधील सर्व प्रवासी हे बीड जिल्ह्यातील रहिवाशी असल्याची प्राथमिक माहिती आहे. हे सर्व जण मंचरहून पारनेरकडे यात्रेसाठी निघाल्याचेही सांगण्यात येत आहे.