भाई सथ्था नाईट हायस्कूल व मासूम संस्थेचा उपक्रम ; विद्यार्थ्यांना भविष्यातील करियरच्या संधीबद्दल मार्गदर्शन रोजगार मेळाव्याचे आयोजन…

रात्रशाळेतील विद्यार्थ्यांना भविष्यातील करियरच्या संधीबद्दल मार्गदर्शन
पॉल रेमेडीयस यांनी विद्यार्थ्यांना दहावी, बारावी व पदवी पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या विविध करियरच्या संधीबद्दल मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, चाकोरीबध्द वाटेवर न जाता विद्यार्थ्यांनी आवडीच्या क्षेत्राची निवड करुन त्या दिशेने वाटचाल करावी. ग्लोबल युगात रोजगाराच्या अनेक संधी निर्माण झाल्या असून, ते ओळखून त्यामध्ये करियर करण्याची गरज निर्माण झाली आहे. मात्र विद्यार्थी पारंपारिक वाटेने जात असल्याने रोजगाराचा प्रश्न निर्माण होत आहे. स्वत:मध्ये कौशल्य निर्माण करुन आपल्या क्षेत्रात पुढे जाण्याचे त्यांनी सांगितले. तर करियरच्या निर्माण झालेल्या मोठ्या संधी विद्यार्थ्यांसमोर माहितीद्वारे खुल्या केल्या.
EDITOR IN CHIEF
TIMES OF NAGAR. GROUP,
PRINT MEDIA,
ELECTRONIC MEDIA,
WEB MEDIA,
DIGITAL MEDIA,
SOCIAL MEDIA.
Leave a comment