TIMES OF NAGAR 

 

चंद्रपूर : आम्ही धर्मांतर खपवून घेणार नाही. त्यामुळे महाराष्ट्रात लवकरच धर्मांतर विरोधी कायदा आणू, बांगलादेशी व रोहिंग्याचा शोध घेऊन त्यांना परत पाठवून देऊ, हिरवा रंग धारण करणाऱ्यांनि सापानी वळवळ थांबवावी, गोहत्या बंद करा, अन्यथा आम्हाला प्रत्येक वॉर्डात  वराह जयंती साजरी करावी लागेल. त्यासाठी आम्हाला सरकारची परवानगी घ्यावी लागणार नाही. राज्यात हिंदूचे सरकार आहे. सरकार घरी येऊन परवानगी देईल, असा इशारा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिला आहे. सरकारमध्ये असल्यामुळे सर्व यंत्रणा आमच्या हातात असून. कोण कुणाची अवेळी बिर्याणी खात आहे. कोण कुणाची दाडी कुरवाळत आहे हे आम्हाला माहीत आहे. आम्ही त्याचा वेळीच कार्यक्रम करू असाही इशारा असून. हिंदू समाजाच्या विरोधात भूमिका घेतली तर जागा दाखवून देऊ. तेव्हा तुमचा पाकिस्तानमध्ये बसलेला अब्बा काही करू शकणार नाही. हिंदू समाजातील मुलीचे आयुष्य जिहादी उद्ध्वस्त करीत आहेत. हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्याना  स्थान नाही, हिंदू समाजाचे बाप सरकारमध्ये आहे. उगाच राज्यात वळवळ  करायची नाही अन्यथा गाठ माझ्याशी आहे. धर्मांतर खापवून घेणार नाही. राज्यात सर्वात कडक धर्मांतर विरोधी कायदा लवकरच आणू. महविकास आघाडी सरकारच्या काळात हे सर्व चालले. आता चालणार नाही. चंद्रपूर  जिल्ह्यात लव जिहादचे २२ प्रकरण आहेत. मोहम्मद पैगंबर यांना मानणारा मुस्लिम समाज पीरबाबांना मानत नाही असेही राणे म्हणाले.

Gau Mata/save cow(संग्रहित दृश्य)

गाईच्या कत्तली खपवून घेणार नाही. गाय ही आपली आई आहे.

हिंदू राष्ट्रात पाहिले हिंदूचे हित बघितले व जोपासले जाईल, मग इतरांना बघणार आहे. वणी, पांढरकवडा येथे मोठ्या प्रमाणात गो हत्या सुरू असून, गोवंश कायद्याची शंभर टक्के अंबलबाजावणी झालीच पाहिजे ही स्पष्ट भूमिका आहे. येथे शरिया कायदा लागू नाही. तो पाकिस्तानमध्ये लागू आहे. गाईच्या कत्तली खपवून घेणार नाही. गाय ही आपली आई आहे. तेव्हा कायद्याचे पालन करा, हा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. हिरवे साप राज्यपाला पेक्षा मोठे झाले आहे का ? हिंदू धर्माकडे वाकड्या नजरेने बघत असाल तर खेर नाही. गोहत्येच्या नावाने मस्ती सुरू आहे ती बंद करा असेही राणे म्हणाले. राज्यात सरकार आणण्यासाठी हिंदू पाठीशी राहिला. त्यामुळे हिंदू समाजासाठी काम करणार आहे. रोहिंग्याना  राज्याच्या बाहेर काढण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करीत आहे. तेव्हा तुम्ही बॅग भरा आणि पाकिस्तानात चालते व्हा असेही राणे म्हणाले. शाहरुख खान व सलमान खान आमच्या हिंदू बहिणीकडे वाकड्या नजरेने बघत असेल तर माझ्याकडे येऊन  त्यांची नावे द्या. त्यांचा तिथेच बंदोबस्त व कार्यक्रम करू असेही राणे म्हणाले. तिरंगा झेंडा मंत्रालयात फडकतो आहे. मात्र त्यापेक्षाही मोठा भगवा झेंडा मंत्रालयावर फडकतो आहे हे लक्षात ठेवा. मी मंत्री म्हणून नाही तर हिंदू म्हणून तुमच्याशी संवाद साधायला आलो आहे असेही राणे म्हणाले.