TIMES OF AHMEDNAGAR
तीन मिनिटांत सगळे ब्राह्मण संपवतो, देवेंद्र फडणवीसांना ठार करतो म्हणत धमकी देणारा किंचक नवले याला सातारा पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. सातारा पोलिसांनी किंचक नवलेला अटक केली असून न्यायालयाने त्याला ७ मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. देवेंद्र फडणवीसांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या आणि ब्राह्मणांना तीन मिनिटांत संपवतो म्हणणारा हा किंचक नवले आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
वेशांतर करुन वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता ?
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत अत्यंत प्रक्षोभक भाषेत वक्तव्य करतानाचा किंचक नवलेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याच प्रकरणात किंचक नवलेला अटक करण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांकडून किंचक नवलेचा शोध घेण्यात येत होता. तो वेशांतर करुन वेगवेगळ्या ठिकाणी फिरत होता. आता सातारा गुन्हे शाखेच्या मदतीने मुंबईतल्या सांताक्रूझ पोलिसांनी शनिवारी त्याला सातारा येथील बाजार या ठिकाणाहून अटक केली. याआधी योगेश सावंत यालाही अटक करण्यात आली आहे. आता पोलीस या त्याचा तपास करत आहेत.