TIMES OF NAGAR
महिला व बालविकास विभागानं एक महत्वाचा निर्णय घेतला आहे. या विभागात १८ हजार ८८२ पदांची भरती होणार आहे. या विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्याबाबत आज मंत्रालयातील दालनात मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यावेळी महाराष्ट्र शासनाने ७० हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, महिला व बालविकास विभागांतर्गत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत ५६३९ अंगणवाडी सेविका व १३२४३ अंगणवाडी मदतनीस अशा एकूण १८८८२ पदांची भरती करण्यात येणार आहे.महिला व बालविकास विभागात विविध पदांसाठी मोठ्या प्रमाणावर भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी ही एक मोठी संधी आहे. कारण १८८८२ पदांची भरती या महिला आणि बालविकास विभागात होणार आहे. अद्याप विभागानं याबाबतच्या कोणत्याही तारखा निश्चित केल्या नाहीत. यासंदर्रभातील भरती प्रक्रियेचे संपूर्ण वेळापत्रक लवकरच जाहीर होण्याचे सागंण्यात येत आहे. महिला व बालविकास विभागाच्या या निर्णयामुळं महिला उमेदवारांना मोठा दिलासा मिळाल्याचे बोलले जात आहे.