मुख्यमंत्री प्रचार रथात असतांना रुग्णांनी मागितली मदत,मुख्यमंत्री शिंदेंनी तत्काळ मदत करण्याचे आदेश देत अर्जावर केली सही.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | CHIEF MINISTER EKNATH SHINDE | LOK SABHA ELECTION | SRIKANTH SHINDE | LOK SABHA CAMPAIGN | HELPED THE PATIENT | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासंदर्भात अनेक किस्से येत असतात. मध्यरात्री भेट देऊन ते आलेल्या नागरिकांचे प्रश्न मार्गी लावत असतात. आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आणखी एक किस्सा समोर आला आहे. सध्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त असताना देखील जनतेच्या तातडीच्या कामांना प्राधान्य मुख्यमंत्री शिंदे देतात. कल्याणमधील एका रुग्णास विशेष बाब म्हणून मदत देण्याचे आदेश निवडणुकीच्या प्रचार रथावरुन शिंदेंनी दिले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कुठल्याही कामासाठी थांबण्याची गरज नाही. तात्काळ निर्णय घेऊ असे नेहमी म्हणतात. त्याची प्रचिती पुन्हा आली.
स्त्रोत.सोशल मिडीया.
मुख्यमंत्री प्रचार रथात असताना त्यांना त्यांना आवाज देत मदतीची मागणी केली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राज्यभर दौरे करत आहेत. कल्याण लोकसभा मतदार संघातील शिवसेनेचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी ते आले होते. कल्याणमध्ये रॅली सुरू असताना एक रुग्ण त्याच्या नातेवाईकांसह उपस्थित होता. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे खासदार श्रीकांत शिंदे यांचा प्रचार करत असतांना उपस्थित रुग्णाच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्री प्रचार रथात असताना त्यांना आवाज देत मदतीची मागणी केली.
स्त्रोत.सोशल मिडिया.
विशेष बाब म्हणून स्वाक्षरी केली आणि तत्काळ मदत देण्याचे आदेश.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ही बाब समजताच त्यांनी तात्काळ मुख्यमंत्री सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांना प्रचार रथावर बोलावून घेतले. रुग्णाला तत्काळ मदत करण्याचे आदेश दिले. त्या रुग्णाच्या अर्जावर प्रचार रथातूनच मुख्यमंत्र्यांनी सही केली. त्यांनी विशेष बाब म्हणून स्वाक्षरी केली आणि तत्काळ मदत देण्याचे आदेश यावेळी दिले. यामुळे रुग्णाच्या नातेवाईकांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.