TIMES OF AHMEDNAGAR
लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सरचिटणीस आणि पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. भाजपाने आज त्यांच्या लोकसभा उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली. या यादीत महाराष्ट्रातील २० उमेदवारांचा समावेश करण्यात आला आहे. भाजपाने यावेळी मुरलीधर मोहोळ यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी दिली आहे. त्यामुळे मुरलीधर मोहोळ समर्थकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.
मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर.
लोकसभा निवडणुकीसाठी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळेल, अशी पहिल्यापासूनच चर्चा होती. मात्र राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी राष्ट्रीय प्रचारक सुनील देवधर आणि माजी आमदार माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचे नावेदेखील चर्चेत आली होती. त्याचबरोबर माजी खासदार संजय काकडे यांनी देखील पुण्यातून उमेदवारी मिळावी यासाठी मोर्चेबांधणी सुरू केली होती. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील यांचे निकटवर्तीय अशी मोहोळ यांची पक्षात ओळख आहे. अन्य पक्षातील नेत्यांबरोबरही त्यांचे मैत्रीपूर्ण संबंध आहेत. त्यामुळे मोहोळ यांनाच उमेदवारी मिळेल असा अंदाज व्यक्त केला जात होता. त्यानुसार बुधवारी मोहोळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. पक्षाकडून अधिकृतरित्या उमेदवारी जाहीर झाल्यावर मुरलीधर मोहोळ यांनी आनंद व्यक्त केला.