तिने सोशल मिडीयावर बॉसला फ्रेंड रिक्वेस्ट पाठून, अश्लील मेसेज पाठवले. बॉसने तिला नग्न फोटो पाठवले.
कोरोना नंतर बेरोजगारी वाढली आहे. अनेक अडचणींचा सामना करत सर्वसाधारण व्यक्ती आपलं जीवन जगण्याचा प्रयत्न करत आहे.महिलाही संघर्ष करण्यात मागे नाहीत. अनेक महिला देखील खासगी नोकरी करून आपले कुटुंब चालवत आहेत. मात्र महिलांना त्रास देणारे उतावळे काही कमी नाही. तसाच एक प्रकार उघडकीस आला आहे. एक बॉस त्याच्या ऑफिसमध्ये काम करणाऱ्या कर्मचारी महिलेची खिल्ली उडवायचा. तसंच तिच्या हातून काही चूक झाली तर सगळ्यांच्या देखत तिला रागवायाचा. या दोन्ही गोष्टींचा राग मनात ठेवून महिलेने नोकरी सोडली पण तिने बॉसचा बदला घेण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर या महिलेने असा बदला घेतला की बॉसला तिने जन्माची अद्दलच घडवली.
बॉसच्या जवळ गेली… अन बॉस भोगळाचा कारभार.
बॉसला संतापून नोरारीला राम-राम ठोलेल्याया महिलेने नोकरी सोडल्यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून बॉसला हनी ट्रॅपमध्ये फसवलं आणि त्याला नरकयातना दिल्या. त्यासाठी तिला दोन माजी कर्मचाऱ्यांनीही मदत केली. या तिघांनी मिळून बॉसला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याचा कट आखला. या कटानुसार त्यांनी बॉसला तीन महिन्यात एका पाठोपाठ एक झटके दिले. शेवटी त्याने पोलिसांशी संपर्क केला.
नग्न फोटो केले व्हायरल.
बॉसचाचा काटा काढण्यासाठी त्या महिलेने सगळ्या सीमाच ओलांडल्या. त्याला हनीट्रॅपमध्ये जेव्हा फसवण्यात आलं तेव्हा या बॉसने त्याचे नग्न फोटो या महिलेला पाठवले. हे फोटो हाती येताच या महिलेने बॉसच्या पत्नीला, त्याच्या जवळच्या नातेवाईकांना एवढंच नाही तर कंपनीच्या एचआरलाही हे फोटो पाठवले. बॉसने माझा कायमच अपमान केला आणि खिल्ली उडवली म्हणून मी हे सगळं केलं असं या महिलेने म्हटलं आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.