लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून आश्रफी यांची माघार ; समाज एकवटला ?
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | LOK SABHA ELECTION | AHMEDNAGAR SOUTH LOK SABHA CONSTITUENCY | SUJAY VIKHE | NILESH LANKA | PARVEZ ASHRAFI | NATIONALIST CONGRESS PARTY, SHARAD CHANDRA PAWAR | BJP | MIM | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
सध्या लोकसभा निवडणुकांनी धुमाकूळ घातला आहे. देशभरात राजकीय वातावरण तापले आहे. सर्वच पक्षीय नेत्यांनी या निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. त्यातच नरेंद्र मोदींनी ४०० पार चा नारा देत भाजप पुन्हा सत्तेत येईल असा विश्वास व्यक्त केला आहे. देशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चेत असलेला लोकसभा मतदार संघ म्हणजे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदार संघ. या मतदार संघात जवळ पास २५ उमेदवार रिंगणात आहेत. मात्र मतदारांचे लक्ष लागून आहे ते म्हणजे विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे आणि माजी.आमदार निलेश लंके यांच्या लढतीकडे.
पवारांचा राजकीय गळ, अन MIM ची धावपळ ?
दक्षिण लोकसभा मतदार संघात माजी. आमदार निलेश लंके विरुद्ध विद्यमान खासदार डॉ. सुजय विखे यांची जंगी लढत रंगणार आहे. मात्र विखे कुटुंबाचा पराभव करण्यासाठी शरद पवार हे १९९१ पासून तैनात आहे. बाळासाहेब विखेंच्या विरोध शरद पवारांचे खंदे समर्थक यशवंत गडाख उमेदवार होते,त्याकाळापासून पवारांचे दक्षिण मतदार संघात जास्त लक्ष आहे. MIM पक्षाला जर उमेदवारी मिळाली तर अल्पसंख्यांक समाजाच्या मतांचे विभाज होईल आणि याचे नुकसान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला होईल असा अंदाज आखून पवारांनी राजकीय ताकद व संबंध वापरून आश्रफी यांची उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी MIM पक्षाकडे विनंती केली असल्याचे समजते. आश्रफिंनी उमेदवारी अर्ज मागे घेताच समाजातून त्यांचे कौतुक होत आहे. अल्पसंख्यांक समाज हा राष्ट्रवादीचे उमेदवार निलेश लंके यांच्या पाठीशी उभा असल्याची चर्चा सध्या मतदार संघात जोरदार सुरु आहे.
ए.आय.एम.आय.एमच्या आश्रफिंची माघार !
दक्षिण लोकसभा मतदार संघातून ए.आय.एम.आय.एम (MIM) पक्षाचे जिल्हाध्यक्ष परवेझ आश्रफी हे देखील गुडघ्याला बाशिंग बांधून निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते. परंतु आश्रफी यांच्या कार्यकर्त्यांच्या महेनतीवर ए.आय.एम.आय.एम (MIM) पक्षाच्या पक्षश्रेष्ठींनी पाणी फिरवल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे शहरात चित्र रंगले आहे. लोकसभा निवडणूक लढवणारच या भूमिकेवर ठाम असलेल्या आश्रफिंना राजकीय दवामुळे माघार घ्यावी लागली असल्याचे त्यांचे कार्यकर्ते खासगीत सांगतात.
आश्रफिंच्या उमेदवारीवर दबाव ?
ए.आय.एम.आय.एम (MIM) पक्षाचे जिल्हाध्यक्ष परवेझ आश्रफी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून नामांकन दाखल केले होते. आश्रफी यांच्या उमेदवारीमुळे शहरात आरोप-प्रत्यारोपांचे सत्र सुरु झाले होते. मतदान विभाजले जाऊ नये, याचा फायदा कोणत्यायाही एका उमेदवाराला होऊ नये यासाठी आश्रफिंना निवडणुकीतून माघार घेण्यासाठी अनेक बड्या राजकीय नेत्यांनी मध्यस्थी केली होती. आणि पक्षाच्या आदेशाने आश्रफिंना या निवडणुकीतून माघार घ्यावी लागली असल्याचे समजते.