शाहरुख खानने केला राम चरणचा अपमान,त्या मेकअप आर्टिस्टने केला मोठा दावा ……
TIMES OF AHMEDNAGAR | JAMNAGAR | ANANT AMBANI AND RADHIKA MERCHANT PRE WEDDING | ANANT AMBANI | RADHIKA MERCHANT | BOLLYWOOD ACTORS | SHAHRUKH KHAN | SALMAN KHAN | AMIR KHAN | RAM CHARAN | SHAH RUKH KHAN ACCUSED OF INSULTING ACTOR RA CHARAN | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINED THROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अनंत अंबानी व राधिका मर्चंट यांच्या जामनगरमधील प्री-वेडिंग सोहळ्यात अनेक बॉलीवूड कलाकारांनी हजेरी लावली होती. शाहरुख खान , सलमान खान, आणि आमिर खान या तिन्ही खाननी एकत्र येत प्री-वेडिंगमध्ये जबरदस्त डान्स केला आणि आलेल्या पाहुण्यांचे मनोरंजन केले. शाहरुख खान , सलमान खान, आणि आमिर खान या तिघांनी ‘आरआरआर’ चित्रपटातील पुरस्कारविजेत्या ‘नाटू नाटू’ या गाण्यावर परफॉर्म केलं होतं. या परफॉर्मन्सनंतर शाहरुख खानने राम चरणचा अपमान केल्याचं म्हटलं जात आहे. राम चरण व त्याची पत्नी उपासना कोनिडेला हे जोडपं अनंत आणि राधिकाच्या प्री-वेडिंगला जामनगरमध्ये उपस्थित होत. शाहरुख खान , सलमान खान, आणि आमिर खान यांनी ‘नाटू नाटू’ गाण्यावर डान्स केला होता. डान्स दरम्यान शाहरुखने राम चरणला मंचावर बोलावलं आणि त्या चौघांनी एकत्र या गाण्यावर ठेका धरल्याचं पाहायला मिळालं. याचवेळी शाहरुखने राम चरणचा अपमान केल्याचा आरोप त्याची पत्नी उपासनाच्या मेकअप आर्टिस्टने केला आहे.
झेबा हसनने शाहरुख खानबद्दल केलेली पोस्ट (फोटो – इन्स्टाग्राम)
शाहरुख खानवर आरोप अन् पोस्ट डिलीट…
राम चरणची पत्नी उपासना कोनिडेच्या मेकअप आर्टिस्ट झेबा हसनने तिच्या सोशल मीडिया हँडलवर एक व्हिडीओ शेअर करत शाहरुख खानने राम चरणचा अपमान केल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर वाद निर्माण झाला. तिने शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल झाला आणि मग राम चरणच्या चाहत्यांनीही तीव्र नाराजी व्यक्त केली. “भेंड, इडली वडा राम चरण, तू कुठे आहेस ? यानंतर मी बाहेर निघून गेले. राम चरण सारख्या स्टारला अशी अपमानास्पद वागणूक ? असं झेबाने स्टोरीला लिहिलं होतं. मात्र नंतर तिने इन्स्टावरुन ही पोस्ट डिलीट केली.
स्त्रोत.सोशल मिडिया.
चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली.
झेबाच्या या पोस्टनंतर राम चरणच्या चाहत्यांनी शाहरुखच्या वागणुकीबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. शाहरुख खानने दक्षिण भारतीय राम चरणला इडली म्हणत वर्णद्वेषी टिप्पणी केली आहे. त्याचे तथाकथित सुशिक्षित आणि मॉडर्न चाहते या गोष्टीचा निषेध करतील का ? असा देखील उलट सवाल करत अनेक चाहत्यांनी कमेंट केल्या आहेत.