किरकोळ लालचेने आतिकने लावले खात्याला सुरुंग , बी.जी.शेखर साहेब आहात नगरमध्ये तर एकदा आतिकला दाखवाच तुरुंग……
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | DISTRICT POLICE, AHMEDNAGAR | SPECIAL INSPECTOR GENERAL OF POLICE B.G SHEKHAR | GUTKHA SUPPLIER ATIQ | ATIQ FORCES MINORS TO SELL GUTKA | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याच्या मागील बाजूच्या कोन्व्हेंट शाळेसमोरील नूतन गार्डनमध्ये अहमदनगर शहर ५३४ व्या स्थापना दिनानिमित्त आज (२७ मे) सुनहरी शाम …. शहर के नाम … या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. पंचशताब्दीचा वारसा लाभलेल्या ऐतिहासिक अहमदनगर शहर स्थापनादिनाच्या पूर्वसंध्येला नयनरम्य निसर्ग सानिध्यात हिंदी आणि मराठी गीतांची सुरेल मैफिल रंगणार आहे. या कार्यक्रमासाठी बी.जी.शेखर पोलीस महानिरीक्षक नाशिक परिक्षेत्र हे उपस्थित राहणार आहे. बी.जी.शेखर यांच्या कामाची आणि नगरकरांच्या प्रश्नांना सोडवण्यासाठी तत्पर असलेली प्रामाणिक भूमिका पाहता बी.जी.शेखर यांच्या सेवापूर्ती निमित्त नगरवासियांच्यावतीने नागरी सत्कार सोहळा देखील पार पडणार आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
जाता जाता खात्यातला गद्दार गाडणार का ?
भिंगार पोलीस ठाण्याच्या हद्दीत अनेक मोठे बेकायदेशीर धंदे जोरात सुरु आहेत. जुगार,सोरट, मटका, बिंगो,वेश्या व्यवसाय,अवैध दारू विक्री या अवैध धंद्यांच्या सुळसुळाटीनमुळे अनेक नागरिक त्रस्त आहेत. मात्र या अवैध कारभार चालवणाऱ्यांना खात्यातील एक गद्दार मदत करत असल्याची चर्चा आहे. आतिक सारख्या मोठ्या गुटखा विक्रेत्याचा तर हा गद्दार पार्टनरच आहे. गुरूंना खुश करून गुरूंचे लाड पुरवण्यासाठी हा मिंधे धडपड करून तब्बल लाखोंची मलई गुरूच्या घशात घालत आहे. थोडे दिवस राहिल्याने गुरु आणि मिंधे हे अवैध कारभार चालकांकडून वाट्टेल त्या पद्धतीने धंदे करून घेत आहेत. यांना कोणत्याही प्रकारच्या कायद्याची भीती राहिलेली नाही. आज पर्यंत केलेल्या सेवेमध्ये बी.जी शेखर यांनी एका सक्षम अधिकाऱ्याची भूमिका बजावली आहे. मात्र जाता-जाता देखील खाकीशी प्रामाणिक राहून त्या गुरु आणि मिंधेच्या रुपात खाकीत वावरणाऱ्या लालच बहादुररांना शेखर साहेब धडा शिकवणार का असा सवाल सध्या नगरकरांच्या मनात निर्माण झाला आहे.
स्त्रोत.सोशल मिडिया.
कधी उध्वस्त होणार आतिकचा KGF
भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुटखा विक्रीचे कारभार देखील मोठ्या प्रमाणात सुरु आहे. चक्क अल्पवयीन मुलांच्या पाठीवरचे दप्तर काढून त्यांच्या डोक्यावर गुटख्याचे पोते देऊन त्यांना गुटखा विक्री करायला लावणारा आतिक नामक व्यक्ती हा पैशांच्या जोरावर भिंगार शहरात दहशत माजवत आहे. खात्यातील मिंधेला हाताशी धरून याचा हा कारभार सुरु आहे. मिंधेने सेवा सोडून जर गुटखा विक्री केली तर नवल वाटणार नाही. मात्र मिंधे सध्या ज्या ठिकाणावर आहे त्या ठिकाणावरून त्याने हे करणे अनपेक्षित असल्याचे बोलले जाते.अतिकचे हे एवढे मोठे साम्राज्य कोण्या दुसऱ्या ठिकाणी नसून भिंगार पोलीस ठाण्याच्या मागेच आहे. भिंगार पोलिसांच्या समोर हि गुटखा विक्री होत असतांना देखील कारवाई करण्याची पोलिसांची हिम्मत कशी होत नाही ? पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का ? आतिकच्या या KGF चा खात्मा करण्यासाठी बी.जी.शेखर हे विशेष यंत्रणा नेमून या आतीकच्या अवैध KGF चा खात्मा करतील कि राहिलेले चार दिवस शांततेत कशे जातील याचा विचार करतील हे पाहण्यासाठी नगरकर उत्सुक आहेत.