TIMES OF AHMEDNAGAR
नागरदेवळे :
अहमदनगर जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून मारामारींच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी नागरदेवळे भागात एका मजुरावर जमावाने हल्ला चढवला होतो. या हल्ल्यात दोन तरुण भयंकर जखमी झाले होते. दोघांना जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र अवस्था अत्यंत गंभीर असल्याने हल्ल्यात जखमी युवकांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हल्ल्यातील पीडित एका तरुणाला अत्यंत जबर मार लागण्यामुळे त्याच्यावर चार तासांची शस्त्रक्रीया करण्यात आली होती.मात्र शस्त्रक्रिया होताच काही तासांच्या आत त्या युवकांवर डिस्चार्ज घेण्याचा दबाव काही यंत्रणेकडून टाकण्याचे प्रयत्न करण्यात आल्याचे समजते.
नागरदेवळे परिसर काहीना काही कारणाने चर्चेत असतोच,नागरदेवळे पासून हाकेच्या अंतरावर बुऱ्हाणनगर आहे. बुऱ्हाणनगर येथे भाजपचे वरिष्ठ नेते तथा माजी.मंत्री शिवाजीराव कर्डिले यांचे निवासस्थान आहे. कर्डिले यांना भेटायला अनेक मोठे नेते मंडळी येत असतात म्हणून देखील हा संपूर्ण पत्ता चर्चेत असतो.
आज जिल्हाभर नागरदेवळे ग्रामपंचायतची वेगळीच चर्चा सुरु आहे. नागरदेवळे ग्रामपंचायतचे माजी सरपंचाने दलित वस्ती सुधार योजना अंतर्गत मंजूर झालेले रस्तेच खाल्ल्याची सध्या जोरदार चर्चा सुरु झाली आहे. काही वर्षापूर्वी नागरदेवळे भागातील काही वस्त्यांच्या विकासासाठी मोठा निधी शासनाच्या माध्यमातून उपलब्ध झाला होता. या रस्त्याच्या कामासाठी आलेला निधी रस्त्यांच्या कामासाठी वापरायचा असतो. मात्र या माजी सरपंचाने हा निधी स्वतःच्या विकासासाठी वापरल्याचे समजते.
रस्तेच खाल्ले.
नागरदेवळे ग्रामपंचायतच्या एका माजी सरपंचाने जनतेला वाऱ्यावर सोडत आपला प्रवास उत्तम गतीने सुरु ठेवला आहे. नागरदेवळे येथील विकासकामांसाठी मागील काही वर्षात मोठा निधी शासनाने उपलब्ध करून दिला होता. या मध्ये दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत रस्त्यांच्या कामासाठी निधी उपलब्ध करण्यात आला होता. मात्र एका बहाद्दूर माजी.सरपंचाने स्वतःच्या ताकदीचा व सत्तेचा वापर करत या योजनेचा निधी खाल्ला असल्याची सध्या चर्चा आहे. रस्ते तयार न करताच या माजी.सरपंचाने रस्ते तयार झाल्याचे दाखून जनतेचा विश्वासघात करून ग्रामपंचायतमधून बिल काढून आपल्या तीजोरीत जमा केले असल्याचे स्थानिक रहिवासी खासगीत सांगतात.
आमदार तनपुरे गप्प ?
काही दिवसांपूर्वी भगत विरुद्ध कर्डिले असा वाद पेटला होता.त्यावेळी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी जिल्हा बँकेचे चेअरमन माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि त्यांचे पुत्र भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्यावर ३५६/३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्याचे निर्देश न्यायालाने दिलेले असतानाही कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलिस निरिक्षक चंद्रशेखर यादव यांनी जाणूनबुजून विलंब करत गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे आरोपी शिवाजी कर्डिले व इतरांना वेळ मिळाल्याने त्यांनी या आदेशास न्यायालयातून स्थगिती मिळवली असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी केला त्यावेळेस केला होता. पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी न्यायालायाचा अवमान केला असल्याने त्यांना तातडीने निलंबित करण्यात यावे. शिवाजी कर्डिल यांच्यावर वेगवेगळ्या स्वरूपाचे २० गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्यांना तातडीने तडीपार करावे, अशी मागणीही प्राजक्त तनपुरे यांनी पोलिसांकडे केली होती.मात्र आता नागरदेवळेचे माजी सरपंच यांनी एवढा मोठा घोळ केला असल्याचे बोलले जात असतांना आमदार तनपुरे यांच्या भूमिकेकडे मतदारांचे लक्ष लागले आहे.