वारूळाचा मारूती येथे भरलेल्या कुस्त्यांना का गेलास म्हणत एका तरुणाला बेदम मारहाण,सात जणांविरूध्द गुन्हा दाखल.
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | AHMEDNAGAR | AHMEDNAGAR DISTRICT POLICE | TOFKHANA POLICE STATION | NALEGAON NEWS | NAVNATH CHHAGAN RATHOD NEWS | PHOTOS USED IN THIS NEWS ARE ARCHIVAL FOOTAGE. | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
अहमदनगर – नागपंचमीच्या दिवशी भरलेल्या कुस्त्यांच्या कार्यक्रमात गेला म्हणून एका युवकाला बंदुकीचा धाक दाखवून तलवार, लोखंडी रॉडने मारहाण करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याची तक्रार तोफखाना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.
(संग्रहित दृश्य)
तोफखाना पोलीस ठाण्यात सात जणांविरूध्द गुन्हा दाखल.
नवनाथ छगन राठोड (वय २४ रा. वारूळाचा मारूती तालीम जवळ, नालेगाव) असे मारहाण झालेल्या युवकाचे नाव आहे.नवनाथ राठोडवर अहमदनगर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याने उपचारादरम्यान दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात सात जणांविरूध्द सोमवारी (१२ ऑगस्ट) सकाळी खुनाचा प्रयत्न, आर्म अॅक्ट कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
(संग्रहित दृश्य)
वारूळाचा मारूती येथे भरलेल्या कुस्तीच्या कार्यक्रमात तु का गेलास ……?
ओमरत्न पुलकेश भिंगारदिवे (रा. वारूळाचा मारूती, नालेगाव), राहुल रोहकले (पूर्ण नाव नाही, रा. वाघ गल्ली, नालेगाव), मयुर साठे, गणेश पवार, यश पवार, ओम कंडागळे, हेमंत शेलार (पूर्ण नावे नाहीत, सर्व रा. म्युन्सीपल कॉलनी, तोफखाना) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. नवनाथ राठोड हे त्यांचे मित्र सचिन ठाणगे व प्रशांत भोसले यांच्यासोबत रविवारी (११ ऑगस्ट) रात्री दहा वाजता दुचाकीवरून दिल्लीगेट ते अमरधाम रस्त्याने जात असताना गणेश मेडिकलच्या समोर ओमरत्न भिंगारदिवे हा त्याच्या चार ते पाच साथीदारांसह थांबलेला होता. त्यांनी नवनाथ व त्याच्या मित्राला अडवले व म्युन्सीपल कॉलनी येथे शिवछत्र बिल्डींगच्या जवळ नेले. ओमरत्न याने नवनाथला शिवीगाळ करून नागपंचमीच्या दिवशी वारूळाचा मारूती येथे भरलेल्या कुस्तीच्या कार्यक्रमात तु का गेला असे म्हणून कपाळाला बंदुक लावली. राहुल रोहकले याने नवनाथ याच्या डोक्यात तलवारीने वार केला. मयुर साठे याने धारदार वस्तूने पाठीवर वार केला. गणेश पवार, यश पवार यांनी लोखंडी रॉडने मांडीवर तर ओम कंडागळे, हेमंत शेलार यांनी लोखंडी रॉडने पाठीवर, कंबरेवर मारहाण करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सदरची घटना पाहून नवनाथचे मित्र घटनास्थळावरून पळून गेले. जखमी नवनाथला त्याच्या दुसर्या मित्राने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. जिल्हा रुग्णालयात नवनाथ याने पोलिसांना जबाब दिला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे करत आहेत.