छोट्या आनंदीची भूमिका साकारणारी बालिका वधु फेम अविका गौर हिने सांगितला तिच्याबरोबर घडलेला तो धक्कादायक प्रसंग….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | MUMBAI | BOLLYWOOD | ACTRESS AVIKA GAUR | ACTRESS LARA DUTTA | ACTRESS AVIKA GOR, WHO BECAME FAMOUS FROM THE SERIAL BALIKA VADHU, HAS TOLD THE INCIDENT THAT HAPPENED TO HER | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
बालिका वधू या मालिकेतून प्रसिद्ध झालेली अभिनेत्री अविका गोर सध्या चर्चेत आहे. या मालिकेत अविकाने आनंदीची भूमिका साकारली होती आणि ती प्रचंड गाजली होती. अगदी कमी वेळातच या मालिकेला प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले होते. बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत पाऊल ठेवणाऱ्या अविकाचा फिल्मी प्रवास आजतागायत सुरू आहे. अविकाने हिंदीसह अनेक तेलुगू चित्रपटांमध्येही काम केले आहे. या ग्लॅमरस प्रवासात अविकाने तिच्याबरोबर घडलेला एक धक्कादायक प्रसंग एका मुलाखतीतून प्रेक्षकांबरोबर शेअर केला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
अविकाने केला तिच्यासोबत घडलेल्या प्रसंगाचा उल्लेख….
हॉटरफ्लाय ला दिलेल्या मुलाखतीत अविकाने या प्रसंगाचा उल्लेख केला आहे. अभिनेत्री म्हणाली की मला आठवतेय, जेव्हा मी स्टेजजवळ जात होते तेव्हा पाठून कोणीतरी मला चुकीच्या पद्धतीने स्पर्श करायचा प्रयत्न करत होता आणि त्याच मिनिटाला मी मागे वळून पाहिले तेव्हा मला दुसरे तिसरे कोणीच दिसले नाही तर फक्त बॉडीगार्ड दिसला आणि असाच स्पर्श जेव्हा दुसऱ्यांदा होणार होता, तेव्हा मी सावध होते. तो स्पर्श करणार इतक्यात मी त्याचा हात पकडला आणि तेव्हाही तो तोच बॉडीगार्ड निघाला. हा प्रसंग घडताच मी त्याच्याकडे पाहिले तेव्हा त्याने माझी माफी मागितली होती. मग ते प्रकरण मी तिथेच सोडून दिले होते. अविका पुढे म्हणाली की त्यांना कळतच नाही की, समोरच्यावर याचा काय परिणाम होईल. आता तर इथे मी माझी गोष्ट सांगतेय जिथे माझ्या आजूबाजूला बॉडीगार्ड असतात आणि आम्हाला एवढे संरक्षण असते. पण बघायला गेले तर अशा खूप साऱ्या मुली आहेत ज्या बॉडीगार्ड्स घेऊन फिरत नाहीत, हे खूप लज्जास्पद आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
लारा दत्तानेही लगावली होती एका माणसाच्या कानशिलात….
अविकाचा तो धक्कादायक प्रसंग ऐकल्यानंतर मुलाखतदाराने अभिनेत्रीला सांगितले की लारा दत्ताजी जेव्हा आम्हाला भेटल्या होत्या, तेव्हा त्यांनी अशाच एका किस्स्याबद्दल आम्हाला सांगितले होते जिथे त्यांनी त्या माणसाच्या कानशिलात लावली होती. यावर प्रतिक्रिया देत अविका म्हणाली की तुम्हाला माहीत आहे की यासाठीदेखील खूप हिंमत असायला हवी. माझ्यात जर ती हिंमत असती की मी त्या माणसाला मारू शकेन, तर आतापर्यंत मी खूप साऱ्या लोकांना मारले असते. आता मला असे वाटते की ते मी करू शकेन पण अशी संधी परत कधीच येऊ नये हीच माझी इच्छा आहे. अविका गोरच्या कामाबद्दल सांगायचे झाले तर अविकाचा आगामी चित्रपट “ब्लडी इश्क” लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.