कामाकडे लक्ष दे असे मालक बोलल्यामुळे मालकावर केले कोयत्याने सपासप वार….
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | NASHIK | CRIME NEWS | A HOTEL OPERATOR HAS BEEN STABBED IN BROAD DAYLIGHT | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
नाशिकरोड परिसरातून धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हॉटेल चालकावर दिवसाढवळ्या कोयत्याने वार करण्यात आला असून ही घटना सीसीटीव्हीत (CCTV) कैद झाली आहे. हॉटेलमधील वेटरला काम करण्यास सांगितल्याने त्याच रागातून वेटर आणि त्याच्या साथीदाराने हल्ला केल्याचा आरोप हॉटेल चालकाने केला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
कोयत्याने सपासप वार…..
याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकरोड येथील मुक्तिधाममागे असलेल्या हॉटेल मथुराचे संचालक नितीन हासानंद सचदेव (रा. देवळाली कॅम्प) हे गेल्या दोन महिन्यांपासून हॉटेल मथुरा चालवत असून, त्यांच्याकडे राजवाडा देवळालीगाव येथे राहणारा डॅनिअल उर्फ डॅनी थोरात हा वेटर म्हणून काम करत आहे. शुक्रवारी दुपारी मालक नितीन यांनी डॅनी यास ग्राहकांकडे आणि कामाकडे लक्ष दे म्हणून सांगितले होते. याचा राग त्याला आल्याने डॅनी याने मालक नितीन सचदेव यांच्याशी वाद करत शिवीगाळ केली आणि थांब तुला बघून घेतो, असा दम देत निघून गेला. थोड्याच वेळात सात जण हॉटेलमध्ये घुसले आणि थेट नितीन सचदेव हे काउंटरवर बसले असता त्यांना काही समजण्याच्या आत टोळक्याने कोयता रॉडने आणि इतर हत्याराने सपासप वार केले. नितीन जीव वाचविण्यासाठी बाहेर पळाले आणि त्यांच्या मागे हल्लेखोर पळाले. नितीन या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. परिसरातील नागरिकांनी नितीन यांना नाशिकरोड येथील हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे बिटको रुग्णालयात दाखल केले आहे. हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांनी नितीन यांच्यावर उपचार सुरू केले असून, नितीन सचदेव यांच्या डोक्याला मोठा मार लागला आहे. त्यांना सुमारे १५ टाके पडल्याची माहिती मिळत आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
पोलिसांनी तातडीने आरोपींना घेतले ताब्यात.
घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने कारवाई करीत तीन संशयितांना ताब्यात घेतले आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलिस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस करीत आहेत. दरम्यान हल्ल्याप्रकरणी नाशिकरोड परिसरात कोयता गँग पुन्हा सक्रिय होत असून, पोलिसांनी अशा गुंडप्रवृत्तीच्या समाजकंटक यांच्यावर कठोर कारवाई करून व्यापारीवर्गात असलेली भीती दूर करावी, अशी मागणी व्यापारी करीत आहेत.