प्रेयसीचा भर रस्त्यात केला प्रियकराने निर्घुण खून, आजुबाजूचे नागरिक फक्त बघ्याच्या भूमिकेत, मृत्युनंतरही तिच्या मृतदेहावर……
TIMES OF AHMEDNAGAR | MAHARASHTRA | VASAI | MURDER | THE BOYFRIEND KILLED HIS GIRLFRIEND ON THE ROAD | THE PHOTO USED IN THIS NEWS IS OBTAINEDTHROUGH SOCIAL MEDIA. WE DO NOT GUARANTEE ANY PHOTO.
वसई – मुंबई पासून काही अंतरावर असलेला वसई परिसर मंगळवारी एका हत्येच्या घटनेने हादरला. वसईच्या गौराईपाडा येथे मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. रोहित रामनिवास यादव (वय २९) या तरुणाने आरती रामदुलार यादव (वय २२) हिची निर्घृणपणे हत्याकेली आहे. रोहितने एका भल्यामोठ्या लोखंडी पान्याने आरतीच्या शरीरावर १५ जोरदार घाव घातले आहेत. यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला आहे. हा सगळा प्रकार सुरु असताना आजुबाजूचे नागरिक बघ्याच्या भूमिकेत राहिले. अनेकांनी या घटनेचे व्हीडिओ शुटिंग केले होते. मात्र कोणीही आरतीच्या मदतीला धावून गेले नाही. आरतीचा मृत्यू झाल्यानंतरही रोहित तिच्या मृतदेहावर एकापाठोपाठ पान्याने घाव घालत होता.
स्त्रोत सोशल मिडिया
हत्त्या होत असताना नागरिक फक्त बघ्याच्या भूमिकेत….
आरतीवर हल्ला करण्यापूर्वी रोहित “क्यों किया ऐसा मेरे साथ ?” असे ओरडत होता. यानंतर त्याने आरतीवर लोखंडी पान्याने हल्ला केला. आरती रक्ताच्या थारोळ्यात पडली होती तेव्हादेखील तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले नाही. यावेळी काहीजणांनी रोहितला रोखण्याचा प्रयत्न केला होता. मात्र रोहित त्यांच्याच अंगावर लोखंडी पाना घेऊन धावून गेला होता. तो शेवटपर्यंत शेजारीच असलेल्या दुकानाच्या पायरीवर बसून आरतीच्या मृतदेहाकडे बघत राहिला. आरती आणि रोहित यांच्यात गेल्या सहा वर्षांपासून प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही काळापासून दोघांमध्ये बिनसल्याने आरती रोहितला टाळत होती. याचाच राग रोहित यादवच्या मनात होता. आरती वसई पूर्वेकडील एका खासगी कंपनीत कामाला होती. ८ जूनलाही रोहितने आरतीला मारहाण केली होती. त्याने आरतीचा मोबाईल फोडला होता. यानंतर आरतीने आचोळा पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. मात्र पोलिसांनी रोहितला केवळ समज देऊन सोडून दिले होते. पोलिसांनी वेळीच कारवाई केली असती तर माझी बहीण वाचली असती, असा आरोप आरतीच्या बहिणीने केला आहे.
स्त्रोत सोशल मिडिया
आरतीच्या कुटुंबियांचे पोलिसांवर गंभीर आरोप….
पोलिसांनी आरतीच्या बहिणीने केलेले सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. आरतीने आम्हाला रोहित आणि तिच्यातील प्रेमप्रकरणाविषयी सांगितले नव्हते. आम्ही रोहित विरोधात गुन्हा दाखल करुन घेतला होता. ९ जूनला रोहितला पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले होते. त्यावेळी रोहितला पोलिसांनी आपल्या भाषेत समज दिली होती. पोलिसी खाक्या दाखवताच आरतीने पोलिसांना थांबवले होते. आमचे आम्ही मिटवून घेऊ, असे तिने पोलिसांनी सांगितले. तरीही आम्ही १४९ ची नोटीस देऊन रोहित यादव विरोधात कारवाई सुरु केली होती, अशी बाजू पोलिसांनी मांडली आहे.