TIMES OF AHMEDNAGAR
मावळत्या वर्षाला रामराम करून नवीन वर्षाचे स्वागत आपण ३१ डिसेंबरला करत असतो. अनेक ठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनेक मोठ्या पार्ट्या दिग्गज्जांकडून आयोजित केल्या जातात. काही पार्ट्यांमध्ये लोक आनंद साजरा करून आपआपल्या घरी जातात. परंतु काही टवाळखोरांकडून सरत्या वर्षाला निरोप देताना वेगळाच जल्लोष केला जातो. त्याला भर पडते ती अवैध आणि चुकीच्या गोष्टींची. रात्री उशिरापर्यंत दारू पिऊन हुल्लडबाजी केली जाते, दारू पिऊन रात्री अपरात्री वाहने चालवली जातात. त्यामुळे या तरुणांमुळे सर्वसामान्यांना त्रास होतो. दारू पिऊन रस्त्याने धिंगाणा करणे,आरडाओरड करणे यामुळे याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतो.याच पार्श्वभूमीवर कोतवाली पोलीसांनी एक मोहीम हाती घेतली आहे.
चंद्रशेखर यादव यांचे नागरिकांकडून चर्चेत कौतुक.
कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव हे हद्दीतील प्रत्येक नागरिकाच्या संपर्कात आहेत.सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यापासून हद्दीतील गुन्हेगारीला आवळण्यात निरीक्षक यादव हे कोतवाली पोलीस ठाण्याच्या इतिहासात यशस्वी पोलीस निरीक्षक मानले जातात. रोडरोमियोंपासून गोवंशहत्या करणाऱ्यांपर्यंत सगळ्यांना कायद्याच्या चौकटीत राहण्याची तंबीच निरीक्षक यादव नाही दिली असल्याचे समजते. कार्यालयात बसून हुकुमशाही न चालवणारे निरीक्षक यादव हे स्वतः मैदानात येऊन बेकायदेशीर कृत्यांवर बेधडक कारवाई करत आहे. निरीक्षक यादव आल्यापासून काही कामचुक्कार कर्मचाऱ्यांची झोपच उडाली असल्याचे समजते. प्रत्येक कारवाईत स्वतः सहभागी होणारे निरीक्षक यादव यांनी सर्वसामान्यांना वर्ष अखेरीस (न्यू इयर पार्टी) होणाऱ्या त्रासाची माहिती घेत टवाळखोरांवर लगाम लावण्याचे नियोजन केले आहे.निरीक्षक यादव यांच्या या कार्याचे नागरिकांनी कौतुक केले आहे.
हुल्लड बाजांवर चालणार निरीक्षक चंद्रशेखर यादव यांचा दंडुका.
पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत दि. २९ पासून दंगा मस्ती करत ट्रिपल सीट फिरणे, दारू पिऊन वाहन चालवणे, विना क्रमांकाची वाहने, पुणे बस स्थानक, माळीवाडा बस स्थानक आणि रेल्वे स्टेशन परिसरात संशयित रित्या फिरणे- दंगा करणे तसेच चालक परवाने नसलेल्यांवर कारवाई करण्यात येत आहे. नवीन वर्षाच्या निमित्ताने पोलीस ठाण्याच्या हद्दीतील हॉटेलचालकांनाही विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
नववर्षाच्या स्वागताला हरकत नाही,मात्र हद्दील बेकायदेशीर कृत्य चालणार नाही.!
‘नववर्षाचे स्वागत करण्याबाबत हरकत नाही मात्र दारू पिऊन हुल्लडबाजी करणे दारू पिऊन अस्ताव्यस्त वाहने चालवणे अशा टवाळखोरांवर कारवाई करणार असल्याच्या सूचना यादव यांनी दिल्या आहेत. अशा प्रकारांमुळे अपघात होण्याची शक्यता अधिक असते. दि.२९ पासून सुरु केलेली ही मोहीम दि.३१ चे रात्री सुद्धा ही मोहीम सुरु राहणार आहे. आत्तापर्यंत १६ वाहने आणि ११ युवकांवर कारवाई केली आहे. या तीन दिवसाच्या कालावधीत रस्त्यावरील वाहनांवर आणि तरुणाईवर कोतवाली पोलिसांचे लक्ष राहणार आहे.