TIMES OF AHMEDNAGAR
२०२३ हे वर्ष अवघ्या एका दिवसात संपणार होत.आज वर्षाच्या शेवटच्या दिवसाने कामगारांचा शेवट केला आहे. वाळूंज एमआयडीसीतील कंपनीला आग लागून ६ कामगारांचा मृत्यू झाला आहे. पुण्यातील त्या कंपनीला आग लागून सात जणांचा मृत्यू झाला होता.रविवारी ३१ डिसेंबर रोजी रात्री छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीमध्ये शाईन इंटरप्राईजेस कंपनीला भीषण आगीत ६ कामगारांचा मृत्यू झाला आहे.जखमींना रुग्णालयात करण्यात आले आहे.
![]()
शाईन इंटरप्राईजेस कंपनीला भीषण आग लागली आहे. हि कंपनी छत्रपती संभाजीनगरच्या वाळूज एमआयडीसीमध्ये आहे. रविवारी रात्री दोन वाजेच्या सुमारास लागलेल्या या आगीत 6 कामगारांचा होरपळून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. कंपनीत दहा ते पंधरा कामगार होते. सर्व कामगार गाढ झोपेत होते. यावेळी ही आग लागली. हे सर्व कामगार बिहारमधील आहेत. कामानिमित्त ते महाराष्ट्रात आले होते. या कंपनीत हॅन्ड्लोज आणि जॅकेट बनवले जात होते. त्यामुळे कंपनीत कॉटनचे कापड मोठ्या प्रमाणात होते. ही आग नेमकी कशामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. पहाटे चार वाजता काही कामगारांना बाहेर काढण्यात यश आले. जखमी झालेल्या कामगारांना घाटी रुग्णालयात दाखल केले आहे.


